|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दूभाजक बांधण्याचे काम नागरिकांनी पाडले बंद

दूभाजक बांधण्याचे काम नागरिकांनी पाडले बंद 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

  सायबर चौक ते एनसीसी भवन मार्गावर पायमल वसाहत येथील नागोबा मंदिर परिसरात दुभाजक बांधण्याचे काम महानगरपालिकेकडून सुरु होते. दुभाजक बांधल्याने परिसरातील नागरिकांना ये-जा करणे अवघड होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हे काम बंद पाडले. तसेच दुभाजकाचे अर्धवट बांधकाम हटवून रस्त्या पुन्हा ये-जा करण्यासाठी सुरु करा या मागणीसाठी रास्तारोको केले. यावेळी उपशहर अभियंता आर. के. जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी दुभाजकाचे काम तुर्तास स्थगिती दिली. तसेच नागरिकांची तक्रार प्रांताधिकारी यांना कळवून त्यांच्याशी चर्चा करुन याबाबत पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

  पायमल वसाहतसह जागृतीनगर, अंबाई डिफेन्स, राऊत कॉलनी आदी परिसरांना जोडणाऱया मार्गावर दुभाजक बांधण्याचे काम महापालिकेकडून सुरु होते. या मार्गालगत बसथांबा ही आहे. येथे दुभाजक बांधल्याने परिसरातील नागरिकांना एनसीसी भवन आणि सायबर चौक शिवाय रस्त्याबदलण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे या कॉलन्यांमधील नागरिकांनी गुरुवारी दुभाजक बांधण्याचे काम बंद पाडले.

  येथीलच काही नागरिकांनी नागोबा मंदिर परिसरात रस्त्याबदल्यासाठी असलेल्या मोकळय़ा जागेमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे येथे दुभाजक बांधून हा मार्ग ये-जा करण्यासाठी बंद करण्यात यावा अशी मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार प्रांताधिकारी यांनी महापालिका प्रशासनास येथ दुभाजक बांधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने येथील दुभाजक बंद करण्याचा कामास सुरवात केली. मात्र दुभाजक बंद केल्यानंतर होणारी प्रचंड गैरसुविधा लक्षात घेता, संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत काम बंद पाडले. यावेळी परिसरातील नागरिक मोठयासंख्येने उपस्थित होते.

  बस थांब्यावर जायचे कसे

 दुभाजक बंद केल्यानंतर रस्त्याच्यापलिकडे असलेल्या बसथांब्यावर जायचे कसे? असा प्रश्न येथील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दुभाजक बांधल्यास बसने प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला विद्यार्थी यांना दुभाजकावरुन उडी मारुन पलिकडे जावे लागणार आहे. यामुळेही येथे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे दुभाजक बांधू नये अशी मागणी नागरिकांनी उपशहर अभियंता आर. के. जाधव यांच्याकडे केली.

Related posts: