|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लाखो वैष्णवांमुळे झाली विठ्ठलमय पंढरी

लाखो वैष्णवांमुळे झाली विठ्ठलमय पंढरी 

पंढरपूर / संकेत कुलकर्णी :

         काया ही पंढरी आत्मा हा विठठल /

         इथे नांदतो केवळ पांडुरंग //

संत एकनाथांनी वर्णन केल्याप्रमाणे पंढरपूरात केवळ आणि केवळ पांडुरंगच सदैव नांदतो. आणि याच पांडुरंगाच्या कार्तिकी एकादशीच्या सोहळय़ासाठी भूवैकुंठ नगरीत सुमारे 4 लाखांहून अधिक वैष्णवांमुळे अवघी पंढरी विठ्ठलमय झाली आहे. असे जरी असले तरी पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर असणारी भाविकांची संख्या कमी झालेली दिसून आली आहे.

आषाढी एकादशीस निद्रिस्थ झालेले विठ्ठल भगवंत कार्तिकी एकादशीस उठतात. आणि भक्तांची सेवा करतात याचसाठी आषाढीनंतरची सर्वात मोठी एकादशी म्हणून कार्तिकीकडे पाहिले जाते. याकरीता पंढरपूरात सध्या तीन लाखांहून अधिक भाविकांची दाटी झालेली आहे.

शुक्रवारी पहाटे एकादशींच्या महापूजेनंतर सोहळय़ाला सुरूवात होईल. दिवसभर हरिनामांचा गजर, नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नानामध्ये भाविक मोठय़ा प्रमाणावर मग्न असताना दिसून येणार आहेत. एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

मोठय़ा संख्येने आलेल्या भाविकांमुळे विठ्ठलांची दर्शनरांग आज गोपाळपूर रोडच्या 6 व्या पत्राशेडपर्यत जाऊन पोहोचली होती. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी सरासरी 5 ते सहा तासांचा कालावधी लागत आहे. तर मुखदर्शन अवघ्या 1 ते दीड तासांमध्ये होत आहे. भाविकांच्या सुविधेसाठी संपूर्ण दर्शनमंडपामध्ये मोठया प्रमाणावर, पिण्याचे पाणी, वेफ्ढर्स तसेच भोजन याशिवाय वैद्यकिय सुविधा या पुरविण्यात आलेल्या आहेत.

आजच्या एकादशीच्या सोहळयासाठी एसटी प्रशासनाकडून सोडण्यात आलेल्या 1400 जादांच्या एसटी बस तसेच रेल्वेकडील विशेष गाडय़ा यांच्यामधून मोठय़ा संख्येने भाविक पंढरपूरात दशमीला उशीरापर्यत दाखल झालेले आहेत. याशिवाय आज सोमवारी देखिल दिवसभरामध्ये अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक भाविक हे खाजगी वाहनाने देखिल पंढपूरात दाखल होत आहे.

वारीच्या निमित्ताने सध्या पंढरपुरात होत असलेल्या गर्दीने संपूर्ण पंढरपूर हाऊसफ्gढल्ल झाले आहे. यामध्ये चंद्रभागेच्या पैलतीरावर असणाऱया 65 एकरमधील सर्व प्लॉट भाविकांना फ्gढलले आहेत. याठिकाणी साधारणपणे 2 लाख 95 हजारांच्या आसपास भाविक असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. कार्तिकेचे मुख्य आकर्षण असणाऱया जनावरांच्या बाजारामध्ये देखिल सुमारे 4 हजार जनावरे दाखल झाली आहेत.

Related posts: