|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दिव्यांग कर्जबाजारी शेतकऱयाची आत्महत्या

दिव्यांग कर्जबाजारी शेतकऱयाची आत्महत्या 

वार्ताहर /उमदी :

जत तालुक्यातील लमाणतांडा (उटगी) येथील दिव्यांग शेतकरी सुभाष धर्माण्णा मुचंडी (वय 52) यांनी आपल्या स्वत:च्या शेतात आत्महत्या केल्याची घटना घडली.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि मयत शेतकरी सुभाष मुचंडी मूळ सोन्याळ गावचे असून ते लमाणतांडा (उटगी) येथील स्वमालकीच्या पाच एकर शेतीतील पत्रा शेड असलेल्या साध्या घरात राहत होते. गुरूवारी सकाळी सहाच्या दरम्यान प्रातःविधीसाठी गेले असता आपल्या शेतातील लिंबाच्या झाडास धोतराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची नोंद उमदी पोलिसात झाली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार कोळी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

   मयत सुभाष हे एका हाताने दिव्यांग होते. परिसरातील दिव्यांगाना विविध सरकारी योजनांची माहिती देणे व दिव्यांग दाखले काढण्यासाठी मदत करायचे. वेळप्रसंगी दिव्यांग दाखले काढण्याच्याकामी सोबत सांगलीला जायचे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मोलमजुरीची कामे करायचे. मयत सुभाष यास भ्रमणध्वनीद्वारे हिंदी भाषेतून ग्लोबल फायनान्शियल कंपनीकडे पैसे गुंतवणूक करण्यासाठी सतत एका महिलेकडून मोबाईलद्वारे संपर्क केला जायचा. तुम्हाला पाच लाख रुपये दिले जातील असे आश्वासन दिले जायचे त्यास बळी पडून सुभाष यांनी तीन ते चार टप्यात असे एकूण दीड लाख रूपये कथित कंपनीच्या गुजरातच्या बँकेच्या शाखेतील खात्यात वर्ग केले, असे सुभाष यांचे मित्र रविकुमार मेत्री यांच्या माहितीप्रमाणे आहे. हे पैसे सुभाष यांनी आपल्या मित्र व नातेवाईका कडून उसने घेतले आहेत.

   मयत सुभाष यांचे अंकलगी येथील व सध्या बेंगळूरू (कर्नाटक) येथे राहत असलेले मित्र डॉ. रविकुमार मेत्री नवरात्र उत्सवानिमित्त गावी आले होते. त्यांना सुभाष यांनी उसने पैसे मागितले होते. पैसे कशाला हवेत असे विचारल्यावर माझे कंपनीकडून पाच लाख रुपये येणार आहेत ते आल्यावर तुला परत देतो असे सांगितले. कोणती कंपनी असे मित्राने विचारले असता माझे ग्लोबल फायनान्शियल कंपनीकडे पाच लाख रुपये येणार आहेत असे सांगितले. आपल्या मित्राची फसवणूक झाल्याचा संशय डॉ. रविकुमार मेत्री यांना आला. त्यांनी इंटरनेटवर सर्च केले असता सदर नावाची कंपनी नसल्याचे लक्षात आले.

Related posts: