|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महामार्ग चौपदरीकरण बैठकीत नागरिक आक्रमक!

महामार्ग चौपदरीकरण बैठकीत नागरिक आक्रमक! 

प्रतिनिधी /चिपळूण :

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात शहरात करण्यात येत असलेली गटार बांधकामे आणि सर्व्हीस रोडच्या उंचीवरून गुरूवारी येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत नागरिक आक्रमक झाले. जोपर्यंत समस्येचे निराकरण होत नाही, तोपर्यंत सुरू असलेली कामे थांबवण्याची मागणी प्रामुख्याने केली. दरम्यान, सर्व्हीस रोडची उंची कमी करण्याबरोबरच रस्त्यालगत गटारे बांधण्याच्या दृष्टीने नवीन प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

महामार्गाच्या शहरातून होत असलेल्या चौपदरीकरणात बहादूरशेखनाका ते पागेपर्यंत काही ठिकाणी गटारांची बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र या गटारांची उंची अधिक असल्याने डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासंदर्भात नागरिकांतील असंतोष लक्षात घेऊन शिवसेनेने महामार्ग कार्यालयावर धडक देत अधिकाऱयांना जाब विचारला होता. जनतेच्या मनात या गटारांमुळे संभ्रम निर्माण झाला असून रस्ता व गटारे यांचा नकाशा नागरिकांसमोर ठेवण्याची मागणी केल्यानंतर हा नकाशा गुरूवारी नागरिकांना दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार गुरूवारी या बैठकीचे आयोजन केले होते.

दरम्यान, महामार्ग कार्यालयात उपविभागीय अभियंता विजय पवार, शाखा अभियंता आर. आर. मराठे यांच्यासह ब्लूम कंपनीचे अजिंक्य जाधव, चेतक कंपनीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, नगरसेवक मोदी, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांनी नागरिकांच्यावतीने समस्या मांडल्या. गटाराची उंची आहे त्याच स्थितीत राहिल्यास त्याचे परिणाम पावसाळय़ात लगतच्या नागरिकांना भोगावे लागणार आहे. मुळातच शहरातून उड्डाण पूल असताना सर्व्हीस रोडची उंची कशासाठी वाढवली जात आहे, असा सवाल केला. यावर गटारे आणि सर्व्हीस रोडची उंची वाढवण्याबाबतचा खुलासा अधिकाऱयांकडून केला गेला. मात्र तो नागरिकांना पटलेला नाही.

Related posts: