|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पैशाच्या वादातून वाहने जाळली

पैशाच्या वादातून वाहने जाळली 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

शहरातील थिबा पॅलॅस परिसरातील रहिवाशी इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहनांना आग लावल्याचा खळबळजन प्रकार समोर आला आह़े ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडल़ी  यामध्ये एक रिक्षा जळून बेचिराख झाली असून 3 दुचाकी व 2 सायकल्सचे आगीमुळे माठे नुकसान झाल़े याप्रकरणी सलमान नझीम पावसकर (32, ऱा थिबा पॅलेस रोड रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आह़े

     कोकणनगर येथील बन्सर केरला याने पैशावरून झालेल्या वादातून ही वाहने जाळल्याचे पावसकर यांनी तक्रारीत नमुद केले आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार पावसकर बुधवारी रात्री जेवण करून झोपले होत़े यावेळी पार्किंगमधून त्यांना काहीतरी जळल्याचा वास आल़ा  पावसकर आपल्या पत्नीसह इमारतीच्या पार्किंगमध्ये आले असता एक रिक्षा, 3 दुचाकी व 2 सायकलनी पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आल़े यामध्ये तक्रारदार यांची रिक्षा (एमएच 08 ई 8751) हि जळून खाक झाली असून सुमारे 1 लाख रूपयांचे नुकसान झाल़े

     तर याच इमारतीमध्ये राहणारे शकील पटाणी यांची दुचाकी (एमएच 08 टी 5263 ) व अन्य एक दुचाकी यांचे 4 हजाराचे नुकसान झाल़े  अन्वर फजलानी यांच्या सुझुकी कंपनीची दुचाकी (एमएच 01 डीएच 9462) हीचे 1 हजार रूपयांचे नुकसान झाल़े याठिकाणी असलेल्या दोन सायकल्सचेही 800 रूपयाचे नुकसान झाल़े असून एकूण 1 लाख 7 हजाराचे नुकसान झाल्याची नेंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े

  दरम्यान तक्रारदार पावसकर याचे काही दिवसांपूर्वी कोकणनगर येथील बन्सर केरला उर्फ बन्या याच्यासोबत पैशावरून वाद झाला होत़ा त्या रागातून केरलाने वाहनांची जाळपोळ केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आह़े याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल कोकरे तपास करत आहेत़

Related posts: