|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीत सापडला भलामोठा मृत ‘व्हेल’

रत्नागिरीत सापडला भलामोठा मृत ‘व्हेल’ 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

रत्नागिरीतील मिरकरवाडा पांढरासमुद्र किनारी गुरूवारी सकाळी भलामोठा व्हेल  जातीचा मासा सापडला. अर्धमेल्या अवस्थेत येथील किनाऱयावर लागल्यानंतर तो काही वेळातच मृत झाला. हा महाकाय मासा पाहण्यासाठी किनाऱयावर मोठी गर्दी झाली होती.

  गुरूवारी सकाळी व्हेल मासा पाण्यावर तरंगताना मच्छीमारांना दिसला.  लाटांच्या प्रवाहाबरोबर हा मासा कोस्टगार्डची फ्लोटींग जेटी असलेल्या पांढरासमुद्र किनाऱयाला लागला. हा महाकाय मासा पाहून सारेच अचंबित झाले. सुमारे 15 फुट तर 5 रुंद असा हा मासा अर्धमेल्या अवस्थेत किनाऱयाला लागला. मात्र काही वेळातच तो मृत झाला. हा मासा दुर्मिळ प्रजार्तीपैकी असल्याने शासनाकडून संरक्षित जलचरात त्याचा समावेश करण्यात आला आहे.

  महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत किनाऱयावल लागल्याची माहिती मिळाल्यानंतर मत्स्य विभाग व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  वनरक्षक मे. जे. पाटील, मिताली कुबल, कांदळवन वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील, वनरक्षक आकाश कडूरकर, पंचायत समिती पशुवैद्यक अभिजीत कसालकर आदी यावेळी उपस्थित होते.

   किनाऱयावर लागलेला हा मासा व्हेल शार्क जातीचा असल्यावर पशुतज्ञांनी शिक्कामोर्तब केले आहे. या माशाला वाघबिर किंवा देवमुशी असे देखील संबोधले जाते. खोल समुद्रात आढळणारा हा मासा किनाऱयावर आढळून आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. नुकतेच ‘क्यार’ चक्रीवादळाचे संकट निघून गेले. त्यानंतर ‘महा’ चक्रीवादळाचे सावट कायम आहे. या वातावरणीय बदलांमुळे सागरी वातावरणातही उलथापालथ झाली असून त्यामुळे हा महाकाय मासा किनाऱयावर आल्याचे बोलले जाते.

मासा राज्य संरक्षीत  

मृत माशाचा वनविभागाकडून पंचनामा झाल्यानंतर तो मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आला. हा मासा राज्य संरक्षित असल्याने त्याला मारणे गुन्हा आहे. मासा मारल्यास किंवा विक्री करण्याच्या गुन्हय़ाखाली संबधिताला 7 वर्षे सक्तमजूरी व 25 हजार रु. दंड इतकी शिक्षेची तरतूद असल्याचे अधिकाऱयांनी यावेळी सांगितले.

Related posts: