|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » क्रिडा » रणजीपटू सीएम गौतम, काझीला अटक

रणजीपटू सीएम गौतम, काझीला अटक 

 बेंगळूर / वृत्तसंस्था :

तीन आयपीएल स्पर्धा खेळणारा कर्नाटकचा माजी रणजीपटू, प्रथमश्रेणी खेळाडू सीएम गौतम व त्याचा माजी कर्नाटक संघसहकारी अबरार काझी यांना गुरुवारी स्पॉटफिक्सिंग केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली. कर्नाटक प्रीमियर लीग स्पर्धेत स्पॉटफिक्ंिसग केल्याचा या उभयतांवर आरोप आहे. राज्य स्तरावर कर्नाटकला अलविदा करत गौतम गोवा संघाकडून तर काझी मिझोराम संघाकडून रणजी स्पर्धेत खेळत आले आहेत.

कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) स्पर्धेच्या मागील दोन हंगामात स्पॉट फिक्सिंग केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. यापैकी यष्टीरक्षक-फलंदाज सीएम गौतम हा बळ्ळारी टस्कर्सचा कर्णधार राहिला आहे. बेंगळुरातील मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखा या उभयतांची चौकशी करेल. आगामी सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेसाठी गौतम व काझी या दोघांचीही त्यांच्या राज्य संघात निवड झाली होती. ही स्पर्धा पूर्वनियोजित रुपरेषेनुसार शुक्रवारपासून खेळवली जाणार आहे. मात्र, अटकेच्या कारवाईमुळे गौतम व काझी यांच्या क्रिकेट कारकिर्दीविषयीही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

केपीएल 2019 मधील अंतिम लढतीत हुबळी टायगर्सविरुद्ध फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा या उभयतांवर ठपका आहे. बळ्ळारी टस्कर्स व हुबळी टायगर्स यांच्यात झालेल्या त्या अंतिम लढतीत संथ फलंदाजी करण्यासाठी गौतम व काझी प्रत्येकी 20 लाख रुपयांची लाच घेण्यात सहभागी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. तो सामना हुबळी टायगर्स संघाने 8 धावांनी जिंकला हाता.

संथ फलंदाजी करण्यासाठी व अन्य काही बाबींसाठी त्या दोघांना 20 लाख रुपये अदा करण्यात आले. याशिवाय, त्यांनी बेंगळूर संघाविरुद्धचा एक सामनाही फिक्स केला होता, अशी माहिती या प्रकरणाची चौकशी करणाऱया पोलीस अधिकाऱयाने दिली.

Related posts: