|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सरकारने दुर्लक्ष वा वेळकाढूपणा केल्यास रस्त्यावर उतरू

सरकारने दुर्लक्ष वा वेळकाढूपणा केल्यास रस्त्यावर उतरू 

प्रतिनिधी /मडगाव :

मडगाव पालिका क्षेत्रातील कचरा समस्या ही प्रसारमाध्यमांतील रोजचीच बातमी होत चालली आहे. आम्ही कचरा समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. सरकारकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. यापुढे सरकारने याकडे दुर्लक्ष वा वेळकाढूपणा केल्यास आम्ही रस्त्यावर उतरण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

गुरुवारी दुपारी सरदेसाई यांनी मडगाव पालिकेला भेट देऊन कचरा समस्येसंदर्भात नगराध्यक्षा डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई, मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक, पालिका अभियंता मनोज आर्सेकर यांच्याशी चर्चा केली.                प्रसारमाध्यमांत कचरा समस्येवर रोज बातम्या येत असतात. त्यात सध्या पालिकेला सुक्या कचऱयावर बेलिंग करण्याच्या बाबतीत जागेअभावी अडचण भेडसावत आहे. स्थानिक आमदारांनी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त करण्यात आल्याने आपण ही भेट दिली आहे, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

मडगाव पालिका क्षेत्रातून दिवसाकाठी 15 टन सुका कचरा गोळा होत असतो. दोन बेलिंग यंत्रांमार्फत त्यातील फक्त 4 टन कचऱयावर बेलिंग करणे शक्मय होते. उर्वरित 11 टन दरदिवशी पडून राहत असल्याने सुक्या कचऱयाचे ढीग सोनसडय़ावर वाढत चालल्याचे सरदेसाई यांच्या नजरेस आणून देण्यात आले.

6 नवीन बेलिंग यंत्रे खरेदी करणार

पालिकेने 6 नवीन बेलिंग यंत्रे खरेदी करण्याचे ठरविले असून त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून मंजुरी मिळविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मडगाव व फातोर्डात प्रत्येकी तीन ठिकाणी अशा प्रकारे मिळून सहा ठिकाणी ही बेलिंग यंत्रे सुक्या कचऱयावर बेलिंग करण्यासाठी वापरात आणली जाणार आहेत.

Related posts: