|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जकात विभागाला का बोलू दिले जात नाही ?

जकात विभागाला का बोलू दिले जात नाही ? 

प्रतिनिधी /मडगाव :

समुद्रात भरकटत दोनापावल येथे पोहोचून गेले कित्येक दिवस तेथे अडकून पडलेल्या नुसी नलिनी या नाफ्तावाहू जहाजासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोलणे बंद करावे. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांना सल्ला देणाऱयांचे ऐकणे बंद करून जकात विभागाला बोलण्याचा अधिकार द्यावा. जकात विभागाला यावर बोलण्याचा अधिकार असतानाही त्यांना का बोलू दिले जात नाही, असा प्रश्न आम आदमी पक्षाचे नेते एल्विस गोम्स यांनी मडगाव येथे बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.

यावेळी वेंझी व्हिएगस व इतर उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर हे त्यांना सर्व काही माहीत असल्याप्रमाणे वागायचे. आताचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांच्यासारखे वागणे बंद करावे. तसेच नुसी नलिनी जहाजासंदर्भात पुन्हा-पुन्हा बोलून ते कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत तेही त्यांनी लोकांसमोर ठेवावे, असे गोम्स यावेळी म्हणाले.

सरकारने अशा समस्यांच्या प्रसंगी जबाबदारीने काम करण्याची गरज असते. ज्वालाग्रही नाफ्ता आणि इतर रसायने, इंधन असलेले ते भले मोठे जहाज दोनापावल समुद्रात अडकून पडलेले असून ते आता केव्हाही फुटण्याची व त्यातील रसायने समुद्रात मिसळण्याची शक्यता आहे. सरकारने जहाजावरील नाफ्ता खेचण्याचे कंत्राट सिंगापूरच्या कंपनीला दिलेले असून त्यावर 4 कोटी खर्च केले जाणार आहेत. हे पैसे कुठून येणार त्याची माहिती सरकारने गोव्यातील जनतेला देण्याची गरज आहे, असे गोम्स यांनी पुढे बोलताना सांगितले.

Related posts: