|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बाणस्तारी आठवडा बाजारात कांदा दर घसरला

बाणस्तारी आठवडा बाजारात कांदा दर घसरला 

प्रतिनिधी /पणजी :

राज्यात कांदा व भाज्यांचे दर गगनाला भिडल्याचे दिसून येताच काल बाणस्तारीच्या आठवडी बाजारात चांगल्या दर्जाचा कांदा 40 ते 38 रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात आला. बेळगावात कांदा मोठय़ा दाखल झाल्याने व त्याचा घाऊक दर 15 ते 20 रुपये प्रतिकिलो असल्याने हा परिणाम दिसून आला आहे. मात्र पणजीतील मार्केटमध्ये व्यापाऱयांनी 50 ते 60 रुपयांनी प्रति किलो दराने विक्री चालविली आहे.

जास्तीत जास्त भाजी विक्रेते बेळगावहून गोव्यात भाजी विक्रीस आणतात. बाजारपेठेत भाज्यांचा दर वाढल की अनेक किरकोळ व्यापारी बाणस्तारी आठवडय़ाच्या बाजाराकडे धाव घेतात. येथे भाजीचा भाव बराच कमी असतो. किमान प्रति किलावर दोन ते तीन रुपयांचा फरक असतो. त्यामुळे या बाजराला दर गुरुवारी व शुक्रवारी ग्राहकांची मोठी गर्दी असते. याचा प्रत्यय काल गुरुवारी 7 रोजी संध्याकाळी काद्यांच्या दारावरून दिसून आला.

 पणजी बाजारापेक्षा बाणस्तारी बाजरात ताज्या भाज्याही मोठय़ा प्रमाणात स्वस्त दराने उपलब्ध झाल्या आहेत. बेळगावात मोठय़ा प्रमाणात दाखल झालेल्या कांद्यामुळे आज शुक्रवारी काद्यांचा दर आणखी घसरण्याची शक्यता आहे.

Related posts: