|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचे एप्रिलमध्ये उद्घाटन

उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचे एप्रिलमध्ये उद्घाटन 

प्रतिनिधी /पणजी :

उच्च न्यायालयासाठी पर्वरी येथे उभारण्यात येत असलेल्या इमारतीचे काम 31 मार्च 2020 पर्यंत पूर्ण होणार असून एप्रिल 2020 पर्यंत या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. काल गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिकाऱयांसह या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.

इमारतीचे 88 टक्के सिव्हिल व 22 टक्के इंटेरियरचे काम पूर्ण झाले आहे. 90 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱया या इमारतीचे कंत्राट एम. व्ही. राव याना देण्यात आले होते. या इमारतीच्या निविदा 79 कोटींच्या आहेत. मात्र काम 90 कोटीपर्यंत जाणार आहे.

जून 2020 पासून या नवीन इमारतीमध्ये न्यायालयाचे कामकाज सुरु व्हायला हवे अशी अपेक्षा आहे. स्वतः उच्च न्यायालय या कामावर नियंत्रण ठेऊन आहे. या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण व्हायला हवे असे त्यांनाही वाटते. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश यांनी स्वतः येऊन इमारतीची व कामाची पाहणी केली आहे. त्याचबरोबर कामाबाबत आढावाही घेत आहेत. एप्रिल 2020 मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व इतरांच्या उपस्थितीत या इमारतीचे उद्घाटन करणे शक्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्हा न्यायालय सध्या भाडय़ाच्या इमारतीत आहे. मात्र जिल्हा न्यायालयासाठी इमारत बांधकाम सुरु आहे हे काम साधारणपणे 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे.

 पाटो पणजी येथे सर्वात उंच सरकारी इमारत

पाटो पणजी येथे सरकारची सर्वात उंच इमारत उभी राहत आहे. सुमारे 75 मिटर एवढी या इमारतीची उंची असणार आहे. सर्व सरकारी कार्यालये या इमारतीत आणण्यात येणार आहेत. राज्यातली ही सर्वात उंच इमारत असेल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. ही प्रशासकीय इमारत असेल व साधारणपणे 75 मिटर एवढी उंच असेल असेही ते म्हणाले.

Related posts: