|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » ‘मूडीज’चा भारताला निगेटीव्ह दर्जा

‘मूडीज’चा भारताला निगेटीव्ह दर्जा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मागील काही वर्षांपासून भारताचा विकासदर खालावत असल्याने ‘मूडीज’ या आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर सर्व्हीस संस्थेने भारताला दिलेला ‘स्थिर’ हा दर्जा हटवून ‘निगेटीव्ह’ दर्जा दिला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती आणि संबंधित संभाव्य धोके लक्षात घेत मूडीजने भारताच्या रेटींगमध्ये घट केली आहे. केंद्र सरकारकडून मंदीशी दोन हात करण्याबाबतच्या धोरणांची योग्य अंमलबजावणी न होणे हेच या निगेटीव्ह दर्जा मागचे कारण असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

आर्थिक मंदीमुळे देशात रोजगाराचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात निर्माण झाला आहे. सर्वसामान्य जनेतचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बँकींग व्यवस्थाही अडचणीत आल्या आहेत. कॉर्पोरेट करात कपात आणि सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा मंदावलेला वेग पाहता, मार्च 2020 मध्ये संपणाऱया वित्तीय वर्षादरम्यान अर्थसंकल्पीय तूट 3.7 टक्के इतकी राहू शकते, असा अंदाज मूडीजने व्यक्त केला आहे.

एप्रिल ते जून अशा तिमाहीच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था 5.0 टक्के दराने पुढे सरकत आहे. हा दर 2013 च्या नंतरचा सर्वात कमी दर आहे. मागणीत झालेली घट आणि वाढता सरकारी खर्च यामुळे भारताचा दर्जा निगेटीव्हमध्ये गेला आहे.

Related posts: