|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाला रग्बीचे विजेतेपद

आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाला रग्बीचे विजेतेपद 

पुणे / प्रतिनिधी :

अहमदनगर येथील वाडिया मैदानावर घेण्यात आलेल्या विभागीय रग्बी स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात पुणे मनपा जिह्याचे प्रतिनिधित्व करताना आबेदा इनामदार कनि÷ महाविद्यालयाने पुणे जिल्हा (ग्रामीण) संघाला पराभूत करताना विजेतेपद पटकावले.

अंतिम लढतीमध्ये आबेदा इनामदार कनि÷ महाविद्यालय संघाने 12-6 असे 6 गुणांच्या फरकाने पुणे जिल्हा संघाला पराभूत केले. विजयी संघाकडून आयेशा शेख, अक्सा अन्सारी व इकरा सैय्यद यांनी चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिसऱया स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये सोलापूर जिल्हा संघाने अहमदनगर जिल्हा संघाला 12-8 असे पराभूत केले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आबेदा इनामदार संघाने अहमदनगर जिल्हा संघाला 10-0 असे एकतर्फी पराभूत केले. विजयी संघाकडून शेहनूर सिद्दिकी, आफरीन शेख यांनी शानदार कामगिरी बजावली. दुसऱया उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पुणे जिल्हा संघाने सोलापूर जिल्हा संघाला 14-8 असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली. संघाने मिळविलेल्या यशासाठी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, आबेदा इनामदार कनि÷ महाविद्यालयाच्या प्राचार्या आयेशा शेख, उपप्राचार्य गफ्फार सैय्यद यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related posts: