|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बाबरी मशिद निकाल : जातीय सलोखा जपावा : सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक किरण भोसले

बाबरी मशिद निकाल : जातीय सलोखा जपावा : सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक किरण भोसले 

टोप(कोल्हापूर)/प्रतिनिधी

अयोध्या व बाबरी मशिदी निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी न्यायालयाच्या निकालानंतर नागरिकांनी सोशल मीडियात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, तसेच हिंदु मुस्लिम एैक्य आबाधित राखुन जातीय सलोखा जपावा असे आवाहन एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी केले. ते टोप व संभापूर येथे आयोजित हिंदू मुस्लिम प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

टोपचे सरपंच पिलाजी पाटील, उपसरपंच विजय भोसले, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, श्रीरंग तावडे, बाबासो मुल्लाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

यावेळी बोलताना किरण भोसले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल तो सर्व नागरिकानी पाळणे बंधनकारक आहे. सोशल मीडियावर या निकालाचे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश प्रसारित करू नयेत. निकालानंतर गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत, महाआरती अथवा समूह पठण याचे आयोजन करू नये. धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने शब्द उच्चारू नये. कोणत्याही प्रकारचे जातीय दंगलीचे जुने व्हिडिओ, फोटो पुन्हा प्रसारित करून अफवा पसरवू नये.
आदी सूचनांचा भंग केल्यास संबंधितावर कायदेशीर व कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महापुराच्या काळात शिरोली येथील हिंदु मुस्लिम बांधवांनी एैक्याची भावना जपली ती जिल्हात आदर्शवत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तर पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे यांनीही नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.

यावेळी या बैठकीला विठ्ठल पाटील, बाजीराव पोवार विजयसिंह पाटील, अशोक भोसले, बाळासो कोळी, राजु कोळी, मयुर पाटील, पोलिस पाटील महादेव सुतार, जमिर अत्तार, जब्बार एकसंबे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार माजी उपसरपंच डि.एस.पाटील यांनी मानले.

Related posts: