|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » नोटाबंदी म्हणजे दहशतवादी हल्ला : राहुल गांधी

नोटाबंदी म्हणजे दहशतवादी हल्ला : राहुल गांधी 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. यावर कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ‘नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता’. या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला. असा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

मोदी सरकारच्या नेटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक लहानसहान उद्योग ठप्प झाले आहेत. या निर्णयामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची वेळ आली. या क्रूर हल्ल्यामागे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली.

 

Related posts: