|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » एमएसएलटीए-योनेक्स् टेनिस स्पर्धेत सिद्धार्थ, जैष्णव, रूमा यांचा विजय

एमएसएलटीए-योनेक्स् टेनिस स्पर्धेत सिद्धार्थ, जैष्णव, रूमा यांचा विजय 

पुणे / प्रतिनिधी  : 

एडय़ुरन्स्म राठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर (इएमएमटीसी) यांच्यावतीने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स्? सनराईज्? 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठे, जैष्णव शिंदे व मुलींच्या गटात रूमा गायकैवारी यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

इएमएमटीसी टेनिस कोर्ट, डिव्हिजनल स्पोर्टस्?ाd कॉम्पलेक्स्? येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकीत सिद्धार्थ मराठेने कर्नाटकच्या दुसऱया मानांकीत प्रणव रेथीनचा 7-5, 6-2 असा तर जैष्णव शिंदेने कर्नाटकच्या दुसऱया मानांकीत ऋषील खोसलाचा 6-2, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या अधिरी अवलने महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकीत काहिर वारीकचा 6-1, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

मुलींच्या गटात उपांत्यपुर्व महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकीत रूमा गायकैवारीने हरियाणाच्या दुसऱया मानांकीत नंदिनी दिक्षितचा 6-4, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या नवव्या मानांकीत परी चव्हाणने पंजाबच्या साहिरा सिंगचा 6-1, 6-4 असा तर महाराष्ट्रच्या सायना देशपांडेने महाराष्ट्राच्याच मधुरीमा सावंतचा 6-4, 3-6, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Related posts: