|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मिरजेत रूग्णांना रस्त्यावर फेकले; शिवसैनिक डॉ. गोऱ्हेंच्या भेटीला

मिरजेत रूग्णांना रस्त्यावर फेकले; शिवसैनिक डॉ. गोऱ्हेंच्या भेटीला 

मुंबई : प्रतिनिधी

मिरज शासकिय रूग्णालयात दाखल असलेल्या तीन रूग्णांना रूग्णालयातून सक्तीने डिस्चार्ज देवून रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना घडली होती. त्यामधील एका रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्या रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर त्वरीत कारवाई करून निलंबीत करावे या मागणीसाठी सांगलीतील शिवसेना पदाधिकांऱ्यानी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. शिवसेना सांगली उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांच्या शिष्टमंडळाने यासंबंधी निवेदन देवून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ही घटना का घडली, कशामुळे घडली, या परिस्थिती मध्ये रूग्णांना का रूग्णालयांच्या बाहेर का काढले या बद्दल संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहे. या चौकशीचा अहवाल घेऊन पुढील आठवड्यात उपसभापतीच्या नात्याने या घटने बद्दल ज्या कुणाकडे विशेष माहिती असेल त्यांनीही माझ्याकडे जरूर सादर करावी. जे जबाबदार असतील योग्य ती कारवाई होण्याच्या दृष्टीकोणातून रूग्णांची अशा प्रकारे हेळसांड होऊ नये. म्हणून मी उपसभापती या नात्याने विशेष लक्ष घालते आहे असे आश्वासन दिले.

या शिष्टमंडळात सांगली मिरज जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी संजय विभूते, उपजिल्हाप्रमुख आनंदराव पवार, उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, उपशहरप्रमुख नितीन काळे, तालुका प्रमुख सुरज पाटील, उपशहरप्रमुख अतुल रसाळ, पप्पु शिंदे, यावेळी उपस्थित होते. तर उपसभापती कार्यालयाचे प्रमुख सचिव रवींद्र खेबुडकर ,सचिव प्रविण सोनावने हे देखील यावेळी उपस्थित होते.

१५ रोजी विधानभवनात बैठक

या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून पुढील आठवड्यात विधानभवनात संबंधित अधिकारी व तक्रारदार यांची बैठक बोलावण्याचे आदेश दिले असून १५ नोव्हेंबर रोजी बैठक होणार असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीना दिली.

Related posts: