|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » चालू वर्षात 1332 सीईओंनी पद सोडले

चालू वर्षात 1332 सीईओंनी पद सोडले 

17 वर्षांतील सर्वाधिक आकडेवारीचा समावेश

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

मॅक्डॉनल्ड्स, जुल, वीवर्क, अंडर आर्मर, नायकी या सारखी अनेक नाव सर्वात मोठय़ा कंपन्यांमधील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पद गेल्या काही दिवसांमध्ये सोडलेल्याची आहेत. ही स्थिती मागील 17 वर्षात प्रथमच निर्माण झाल्याची नोंद केली आहे. फक्त ऑक्टोबर महिन्यातच तब्बल 172 सीईओंना आपला पदभार सोडावा लागला आहे. या तुलनेत सप्टेंबरमध्ये पद सोडलेल्या सीईओंची संख्या 14 टक्के आहे. आणि ऑक्टोबर 2018 मध्ये पदभार सोडणाऱयाच्या संख्येत हा आकडा 15 टक्के अधिक आहे. त्यामुळे आतापर्यंत 1 हजार 332 सीईओंनी आपले पद सोडल्याची माहिती करिअर ट्रकिंग फर्म चॅलेंजरच्या अहवालात मांडण्यात आली आहे.

दोन वर्षांपासून काम सुरु

जवळपास 2002 पासून चॅलेंजरने सीईओ ट्रकिंगचे काम सुरु केले होते. त्यामुळे आपापर्यंतच्या अहवालात इतक्या मोठय़ा प्रमाणात सीईओंनी पद सोडल्याची नेंद करण्यात आली नाही. 

नवीन बदलाचा सामना

कंपनी आपल्या ध्येय धोरण राबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये नेतृत्व गुण, अन्य समस्या सोडवण्याची क्षमता यासह अन्य गोष्टीचा सामना करण्यासाठी सीईआंsना अनेक कंपन्यांनी बदलले आहे. असेही चॅलेंजरच्या अहवालात सांगितले आहे.

Related posts: