|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News »  मुख्यमंत्र्यांवरील खोटारडेपणाचे आरोप खोटे : सुधीर मुनगंटीवार

 मुख्यमंत्र्यांवरील खोटारडेपणाचे आरोप खोटे : सुधीर मुनगंटीवार 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला खोटारडेपणाचा आरोप धादांत खोटा आहे, अशा शब्दांत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे यांना उत्तर दिले.

खोटे बोलण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. भाजपाचे सत्तेवर नव्हे, तर सत्यावर प्रेम नाही. सर्वसामान्य, दीन दुबळय़ांचा हा पक्ष असून, पक्षाच्या नावात जनता केंद्रित आहे. पक्षाला खोटे ठरविण्याआधीच सेनेने विचार करायला हवा. महायुतीचे  सरकार यावे, असा जनादेश आहे. मात्र, त्याचा अनादर केला गेला. आता खोटे ठरविण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला खोटारडेपणाचे नव्हे, तर विकासाचेच राजकारण करायचे आहे.

सत्तेत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आजवर कुणी टीका केली नाही, असे सांगत राममंदिरासाठी आम्ही उत्तर प्रदेशचे सरकारही अर्पण केले होते, असेही त्यांनी नमूद केले.

Related posts: