|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » भारतात कॉग्निजेंटकडून लवकरच रोजगार उपलब्धी!

भारतात कॉग्निजेंटकडून लवकरच रोजगार उपलब्धी! 

2020 मध्ये 23 हजारहून अधिक रोजगार निर्मिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जागतिक स्तरावरील कार्यरत असणारी आयटी कंपनी कॉग्निजेंटडून गेल्या काही दिवसात हजारो कर्मचाऱयांची कपात करण्याची घोषणा केली होती. परंतु सध्या भारतात 2020 मध्ये रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये तब्बल 23 हजारहून अधिकचा रोजगार उपलब्ध करणार असल्याचेही म्हटले आहे. हा रोजगार विज्ञान, तंत्रज्ञान, इंजीनिअरिंग आणि गणितशास्त्र या क्षेत्रात उपलब्ध करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

भारतामधील टॅलेंटचा वापर

भारताकडे दोन विशेष गोष्टी आहेत. एक तंत्रज्ञान आणि दुसरी टॅलेंट यांचा वापर करुन घेण्यासाठी आम्ही आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे सीआयआय कनेक्ट-2019 च्या संमेलनात कॉग्निजेंट इंडियाचे सीएमडी रामकुमार राममूर्ति यांनी म्हटले होते.

2014 ते 2018 या कालावधीत भारतात कर्मचाऱयांची संख्या 66,000 नी वाढली आहे. हा आकडा चालू वर्षातील नऊ महिन्यातील आकडेवारीसहीत 75 हजार कर्मचारी संख्या होत असल्याचे राममूर्ति यांनी म्हटले आहे. तर भारतामधील जवळपास 2.9 लाख कर्मचारी काम करत आहेत. यात तब्बल 2 लाख भारतीयाचा समावेश आहे.

Related posts: