|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » स्टेट बँकेकडून व्याजदर कपात

स्टेट बँकेकडून व्याजदर कपात 

कर्ज होणार स्वस्त : 0.05 टक्क्यांची कपात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून कार्यरत असणारी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पुन्हा 0.05 टक्के व्याजदर कपातीची घोषणा केली आहे. ‘एमसीएलआर’ आधारावर कर्जाच्या व्याजदरांत सातव्यांदा कपात केली आहे. त्यामुळे एमसीएलआरचे व्याज दर 8 टक्क्यांपर्यंत खाली येणार आहेत. तर दुसरीकडे बँकेने ठेवीवरील व्याजदरात बदल केले आहेत. एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठवींवरील व्याजदरात 0.15 टक्क्यांची कपात केली आहे. तर मोठय़ा रकमेच्या ठेवींवर 30 ते 75 बेसिस पाँईटची कपात केली आहे. गृहकर्ज, वाहन आणि व्यक्तीगत कर्ज स्वस्त होणार आहेत. नवीन व्याजदर 10 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार असल्याचे बँकेनी सांगितले आहे.

याबरोबरच खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपले एमसीएलआरच्या आधारे 10 बेसिक पाँईटची कपात केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून चालू वर्षात तब्बल पाच वेळा रेपो दर कमी कपात केला आहे. एकूण आरबीआयकडून 135 बेसिक पाँईट्सने कपात केली आहे.

 

Related posts: