|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » 2018 मध्ये अब्जाधीशांची संपत्ती घटली

2018 मध्ये अब्जाधीशांची संपत्ती घटली 

2003 पासून केवळ तीन वेळा संपत्तीत नोंदवली घट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जागतिक पातळीवर मागील तीन वर्षात सलग अब्जाधीशांची संपत्ती वाढली आहे. परंतु फक्त 2018 या वर्षामध्ये तीन वर्षांत प्रथम अब्जाधीशांची संपत्तीत घट नोंदवली आहे. एकूण संपत्तीमधील घट 388 अब्ज डॉलर्सने कमी झाली असल्याची माहिती ब्लूमबर्गच्या अहवालामधून देण्यात आली आहे.

अब्जाधीशांची संपत्तीत 8 टक्क्यांनी घट आशियामध्ये झाल्याचे पहावयास मिळाले आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या व्यापाराचा परिणाम झाला आहे. परंतु यात अमेरिकेतील अब्जाधीशांची संख्या समाधानकारक राहिली आहे. कारण तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधीत असणाऱया व्यवसायामधून फायदा झाला आहे. याच क्षेत्रातील 2018 मध्ये 89 टक्के व्यवसाय होते. 

Related posts: