|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग » ‘क्विकहील’चा ‘एल 7 डिफेन्स’शी करार

‘क्विकहील’चा ‘एल 7 डिफेन्स’शी करार 

प्रतिनिधी/ पुणे

माहिती तंत्रज्ञान सुरक्षितता आणि डेटा संरक्षणाबाबतच्या सोल्युशन पुरविणाऱया आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या क्विकहील टेक्नॉलॉजीज् लिमिटेडने इस्त्राईलस्थित ‘एल 7 डिफेन्स’ या कंपनीत 3 लाख अमेरिकन डॉलर इतकी धोरणात्मक गुंतवणूक करण्याबाबत करार केला आहे.  एल 7 डिफेन्सची स्थापना सन 2015 मध्ये झाली. ही सायबर सिक्मयुरिटी क्षेत्रातील नवोद्योग (स्टार्टअप) कंपनी असून, बॉटनेट आणि डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस (डीडीओएस) या आक्रमणांपासून उद्योगांचा बचाव करण्यासाठी आवश्यक अशा नेक्स्ट जनरेशन वेब एप्लकेशन फायरवॉल (एनजी-डब्ल्यूएएफ) आणि एप्लकेशन प्रोग्राम इंटरफेस (एपीआय) सिक्मयुरिटीया तंत्रांमध्ये त्यांची तज्ञता आहे.

सेक्रिटतर्फे सध्या एंडपॉइंट सिक्मयुरिटी, युनिफाइड थ्रेट मॅनेजमेंट, सिक्मयुअर वेब गेटवे, एंटरप्राइज मोबिलिटी मॅनेजमेंट, फुल डिस्क एन्क्रिप्शन आणि डेटा लॉस प्रीव्हेन्शन आदी सेवा दिल्या जातात. यासेवा स्वनिर्मितगो डीप या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या बळावर चालणाऱया आहेत.

याबाबत बोलताना क्विक हील टेक्नॉलॉजीज् लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश काटकर म्हणाले, ‘ग्राहकांचा डिजिटल प्रवास डेंजरस सायबर आक्रमणांपासून बचावासाठी क्विक हील टेक्नॉलॉजीज् सर्वोत्तम बचाव यंत्रणा पुरविण्यास कटिबद्ध आहे. या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे आम्हाला एल7 डिफेन्सचे तंत्रज्ञान वापरून आमच्या औद्योगिक ग्राहकांना एनजी-डब्ल्यूएएफ आणि एपीआय सिक्मयुरिटी देणे शक्मय होणार आहे.

Related posts: