|Friday, February 28, 2020
You are here: Home » उद्योग » मूडीजच्या अहवालानंतर बाजार कोसळला

मूडीजच्या अहवालानंतर बाजार कोसळला 

सेन्सेक्स 330 अंकानी घसरला : निफ्टी 11,908.15 वर बंद

वृत्तसंस्था / मुंबई

देशात आर्थिक मंदीमुळे अनेक समस्याचा पाठलाग करणारी भारतीय अर्थव्यवस्थेला मूडीज या आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर सर्व्हिस संस्थेने भारताला निगेटीव्ह दर्जा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताचा विकासदर मंद राहिला आहे. त्याचे पडसाद आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजारावर  राहिला असून उच्चांकी विक्रमाची नोंद केलेल्या बीएसई सेन्सेक्स 330 अंकानी घसरल्याचे पहावयास मिळाले आहे.

मागील दोन दिवस बाजारात तेजीचे वातावरण होते परंतु त्याला शुक्रवारी बेक लागला आहे. दिवसभरातील व्यवहारानंतर दिवसअखेर 330 अंकानी सेन्सेक्स घसरुन निर्देशाक 40, 323.61 वर बंद झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी दिवसअखेर 0.86 टक्क्यांनी घसरून निर्देशाक 11,908.15 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसईतील कंपन्या सन फार्मा, वेदान्ता, ओएनजीसी, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, एशियन पेंट्स आणि इन्फोसिस यांचे समभाग 4.23 अंकानी घसरले आहेत. दुसऱया बाजूला येस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक यांचे समभाग मात्र 3.76 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत.

महत्वाच्या क्षेत्रांची पडझड

बीएसईमधील धातू, ऑईल ऍण्ड गॅस, हेल्थकेअर, आयटी, टेक, दूरसंचार आणि पॉवर यांचे निर्देशाक 1.80 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. तर कन्झ्युमर डय़ूरेबल्स यांचे निर्देशाकांनी 1.55 टक्क्यांची वधार नोंदवली आहे.

Related posts: