|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » कोल्हापूरच्या महापौर, उपमहापौरांचा राजीनामा

कोल्हापूरच्या महापौर, उपमहापौरांचा राजीनामा 

प्रतिनिधी / कोल्हापूर

महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर माधवी गवंडी यांच्यासह उपमहापौर भुपाल शेटे यांनी पदाचा राजीनामा दिला. हे दोन्ही राजीनामे सभेमध्ये मंजुर करण्यात आले. राजीनाम्यानंतर ही दोन्ही पदे रिक्त झाल्याने नव्या महपौर-उपमहापौर निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महपौरपदाची निवडणुक घेण्यावरील राज्य सरकारचे निर्बंध उठल्यामुळे माधवी गंवडी यांनी शुक्रवारी महापौर पदाचा राजीनामा दिला. तसेच उपमहापौर भूपाल शेटे यांनीही उपमहापौर पदाचा राजीनामा दिला. हि दोन्ही पदे रिक्त झाल्याने नवीन महापौर निवडणुकीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. महापालिकेकडून महापौर-उपमहापौर निवडीसाठीच्या सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित करण्यासाठीचे पत्र विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविला आहे.

गवंडी यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीकडून सुरमंजिरी लाटकर यांचे नाव महापौर पदासाठी जवळपास निश्चत आहे. तर उपमहपौर पदासाठी काँग्रेसकडून अशोक जाधव व संजय मोहिते यांचे नाव आघाडीवर आहे. सुरमंजिरी लाटकर यांचे महापौर पद जरी निश्चित झाले असले तरी त्यांना किती महिन्याचा कालावधी मिळणार हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पद वाटपाच्या फॉर्म्युलानुसार एक वर्षाच्या कालावधीसाठी महपौर पद राष्ट्रवादीकडे होते. हा कालावधी डिसेंबर महिन्यात संपणार आहे. त्यामुळे लाटकर केवळ एक महिन्यासाठी महापौर होणार कि त्यांना मुदत वाढवून मिळणार याकडे महापालिका वर्तूळाचे लक्ष लागून राहिले आहे.

लाटकरांना मुदत वाढ मिळाणार?

महापौर पदासाठी लाटकरांना मुदतवाढ मिळणार का? हा सध्या अनुत्तरीत प्रश्न आहे. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी महापौर पदाच्या कालावधीमधील एक दिवसही काँग्रेस राष्ट्रवादीला सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाटकर केवळ महिन्यासाठी महापौर झाल्या तर त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखे होईल. त्यामुळे राष्ट्रवादीकडून लाटकर यांना दोन ते तीन महिने मुदतवाढ देण्याची मागणी काँग्रेसकडे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाटकर यांना महापौर पदासाठी मुदत वाढवून मिळणार कि नाही हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.

विरोधकांकडूनही निवडणुकीची तयारी

सध्या महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीला बहुमत आहे. तरीही महापौर पदासाठी सुरमंजिरी लाटकर यांचे नाव पुढे आल्याने विरोधकांकडूनही महापौर निवडणुक जोरदार पद्धतीने लढविली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी महापौर पदासाठी भाजप-ताराराणी आघाडीकडून स्मिता माने यांचे नाव आघडीवर आहे. त्यांचे नाव जर निश्चित झाले महापौर पदाची निवडणुक रंगतदार होणार आहे.

Related posts: