|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बांदा-दोडामार्ग रस्ता डांबरीकरण सुरू

बांदा-दोडामार्ग रस्ता डांबरीकरण सुरू 

बांदा सरपंच अक्रम खान यांनी केले होते विशेष प्रयत्न

प्रतिनिधी / बांदा:

बांदा-दोडामार्ग रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. पावसाळय़ात या मार्गावर पडलेल्या खडय़ांमुळे वाहनधारक व ग्रामस्थांना मोठय़ा गैरसोयींना सामारे जावे लागत होते. या मार्गावरील बांदा कट्टा कॉर्नरपासून पहिला टप्प्याच्या डांबरीकरणाच्या कामास सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरुवात केल्याने वाहन चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बांदा सरपंच अक्रम खान यांनी या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला होता.

बांदा-दोडामार्ग रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला होता. बांदा कट्टा कॉर्नरपासून पानवळपर्यंत चालत जाऊ शकत नाही, असे खड्डे पडले होते. पूर्णपणे रस्त्याची दूरवस्था झाली होती. या मार्गावर महाविद्यालयीन व शाळकरी मुलांना खड्डय़ांमुळे शाळेत जाणे अवघड झाले होते. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत अक्रम खान यांच्याकडे व्यथा मांडत संबंधित विभागाला जाब विचारा, अशी मागणी केली होती. खान यांनी बांधकाम विभागाला जाब विचारला होता. खान यांच्या नेतृत्वाखाली बांदा व दोडामार्ग येथील स्वाभिमान पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारत बांधकाम विभागाच्या कार्यालयाला घेरावही घातला होता. त्यावेळी संबंधित विभागातर्फे खड्डे भरण्यासाठी सुरुवात झाली होती. मात्र पावसाचे प्रमाण जास्त असल्याने खड्डय़ात भरलेल्या जांभ्या दगडाची माती पुन्हा वाहून रस्ता चिखलमय झाला होता.

Related posts: