|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भुयारी वाहिनीचे काम तातडीने हाती घ्या

भुयारी वाहिनीचे काम तातडीने हाती घ्या 

बैठकीत प्रभारी नगराध्यक्षांच्या वीज अधिकाऱयांना सूचना

वार्ताहर / सावंतवाडी:

गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या 11 कोटी रुपये खर्चाच्या भुयारी वीज वाहिनीचे काम पुणे येथील आयटेक कंपनीला देण्यात आले आहे. 16 किलोमीटरच्या या वाहिनीच्या खोदाईसाठी सुमारे साडेचार कोटी रुपये कंपनीने नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करून तात्काळ कार्यवाही हाती घ्यावी, अशा सूचना प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी वीज अधिकाऱयांना केल्या. सदर काम सुरू न झाल्यास येत्या 31 मार्चनंतर 11 कोटी रुपये परत जाणार आहेत. त्यामुळे भुयारी वाहितीसाठी कोरगावकर यांनी पुढाकार घेतला आहे.

कोरगावकर यांनी शुक्रवारी वीज अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी प्रभारी उपकार्यकारी अभियंता अनिल यादव, नगरसेवक नासीर शेख, अभियंता तानाजी पालव, वरिष्ठ लिपिक आसावरी शिरोडकर आदी उपस्थित होते.

कोरगावकर यांनी वीज वाहिनीसाठी निधी मंजूर झाला आहे. मग काम सुरू का करत नाही, अशी विचारणा अधिकाऱयांना केली. रस्ते खोदाईसाठीचा दर पालिकेने निश्चित केला. त्यानुसार पालिकेच्या अखत्यारितील 12 किलोमीटर रस्ते खोदाईची रक्कम कंपनीने अदा करावी, असे स्पष्ट केले. पालिकेकडे तीन कोटी रुपये भरून काम सुरू करा. उर्वरित सहा किलोमीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. त्यासाठी कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांच्याशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावा, असेही सांगितले.

नासीर शेख यांनी भुयारी वीजवाहिनीचे पैसे मागे जाता नयेत, यादृष्टीने पावले उचला, असे स्पष्ट केले. तर शहरातील गंजलेले वीजखांब, वाहिन्या बदलण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना कोरगावकर यांनी केल्या.

वीजवाहिनीचे काम गतीने करणार!

उपकार्यकारी अभियंता यादव यांनी सांगितले की, शहरात भुयारी वीजवाहिनीसाठी 10 कोटी 81 लाख रुपये मंजूर आहेत. पुणे येथील आयटेक कंपनी काम करणार आहे. 16 किमी खोदाई व 39 किमीची 11 केव्ही लाईन टाकण्यात येणार आहे.

Related posts: