|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » साडेआठ पर्यंत पोहोचतील मृतदेह

साडेआठ पर्यंत पोहोचतील मृतदेह 

पंढरपूर / सांगोला / प्रतिनिधी

सावळा विठोबा हा विटेवर गेल्या 28 युगापासून उभा आहे. त्याच विटेवरील विठोबाच्या दर्शनापूर्वीच विटांच्या ट्रक्टरने बेळगाव येथील विठ्ठलभक्तांवर काळाचा घाला घातला. कारण विटा घेउन जाणाऱया ट्रक्टरची आणि विठ्ठल भक्त असणाऱया पिकपची समोरासमोर धडक झाली. आणि यामध्ये पाच विठ्ठल भक्त हे जागीच ठार झाले. कार्तिकी एकादशीच्या सोहळय़ासाठी बेळगाव येथील भाविक पंढरपूर येत होते. यावेळी सांगोला तालुक्मयातील मांजरी येथे या भाविकांच्या वाहनावर काळाने घाला घातला. ट्रक्टर आणि पिकपची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये पाच जण जागेवर मृत्युमुखी पडले तर सहा जण जखमी झाले. सदरच्या अपघातात मृत झालेले वारकरी बेळगाव तालुक्मयातील मंडोळी गावचे आहेत. अपघातात मृत पावलेल्या भाविकांमध्ये लक्ष्मण परशराम आंबेवाडीकर (वय– 46) महादेव मल्लाप्पा कणबरकर (वय-46) अरुण दत्तात्रय मुतकेकर (वय– 36) यल्लाप्पा देवाप्पा पाटील (वय– 37) कृष्णा वामन कणबरकर (वय– 46) यांचा समावेश आहे. यातील चार भाविक मंडोळी गावचे आहेत. तर एक भाविक इतर ठिकाणचा आहे.

तरूण भारतची सेवाभाविता

पत्रकार हा पहिल्यांदा कार्यकर्ता असला पाहीजे ही तरूण भारतचे संपादक बाबूराव ठाकुर यांची शिकवण. समुहप्रमुख सल्लागार संपादक किरण ठाकुर आणि कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर यांनी पुढे नेली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत तरूण भारत परिवारातील प्रत्येक सदस्य आज कार्यकर्ताबनून सेवाभावितेचे व्रत जपत आहे. आजही सांगोल्याजवळ झालेल्या अपघाताची बातमी तरूण भारतने कव्हर केलीच पण मृतांचा नातेवाईकांना व जखमींना सर्वतऱहेची मदत केली. जेवण, नाष्टा, रूग्णसेवा, शवविच्छेदन, शववाहिका यासाठी आपले सांगोला प्रतिनिधी रवि साबळे व पंढरपूर प्रतिनिधी संकेत कुलकर्णी मदतीत आघाडीवर होते. लोकमान्य ने चहा, जेवणाचा खर्च केला.

Related posts: