|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेला गुपतर्फे बाईक रॅली

बेला गुपतर्फे बाईक रॅली 

बेला गुपतर्फे शुक्रवारी महिलांची बाईक रॅली झाली या बाईक रॅलीला तरूणींसह महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला या रॅलीत 200 हून अधिक महिलांनी उत्फूर्तपणे सहभाग दर्शविला. राणी चन्नम्मा सर्कलपासून रॅलीला सुरूवात करण्यात आली.

रॅलीचे हे दुसरे वर्ष असून महिलांना सक्षम बनवून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजन करण्यात येत आहे. महिला सशक्तीकरणाचे अनोखे रूप या रॅलीतून पहायला मिळाले. प्रारंभी डीसीपी यशोदा वटंगुडी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बॉईक रॅलीला सुरूवात करण्यात आली. यावेळी महिलांनी डीसीपी यशोदा वटंगुडी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कॉलेज रोड, संचयनी सर्कल, गोवावेस, खानापूर रोड मार्गे अनगोळ येथील रामनाथ मंगल कार्यालयात रॅलीची सांगता झाली. रॅलीत बेटी को अधिकार दो बेटे जैसा प्यार दो, कन्या संतान बचानी है भ्रुण हत्या मिटानी है, वाहतुकीचे नियम पाळा, पर्यावरण वाचवा, झाडे जगवा आदी आशयाचे फलक घेऊन तरूणी सहभागी झाल्या होत्या.

या रॅलीत सुरेखा मुमीकट्टी, स्नेहल जाधव, लक्ष्मी चवळी आश्विनी लेंगडे, विजय लक्ष्मी, शितल शानभाग, शिल्पा केकरे, आशा पाटील, स्वाती पाटील यासह तरूणी, महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Related posts: