|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » leadingnews » अयोध्याप्रकरणी उद्या ‘सर्वोच्च’ निकाल

अयोध्याप्रकरणी उद्या ‘सर्वोच्च’ निकाल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ऐतिहासिक अयोध्या वादावर लवकच पडदा पडणार आहे. उद्या (दि. 9) रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाचा निकाल सुनावणार आहे. यापूर्वी 16 ऑक्टोबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती, त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद वादावर चर्चेतून तोडगा काढण्यात अपयश आल्यानंतर पाच ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात सलग 40 दिवस सुनावणी झाली. ही सुनावणी 16 ऑक्टोबरला पूर्ण झाली होती. 17 नोव्हेंबरवला सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर निकाल त्यापूर्वीच येणे अपेक्षित होते. त्यानुसार, आता उद्या, शनिवारी यावर अंतिम निकाल येणार आहे.

दरम्यान, अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली, मुंबईत सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेण्यात येत असून तशी तयारी केली आहे. 2.77 एकर जागेच्या या वादावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती. या न्यायपीठात  न्या. एस. ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा आहे. रामलल्ला, निर्मोही आखाडा, अखिल भारतीय राम जन्मस्थान पुनरुत्थान समिती, हिंदू महासभेचे दोन गट, शिया वक्फ बोर्ड आणि गोपाल सिंग विशारद यांचे कायदेशीर वारस हे या खटल्यातील पक्षकार आहेत.

Related posts: