|Thursday, November 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ब्रिटनमध्ये आता सार्वत्रिक निवडणुका

ब्रिटनमध्ये आता सार्वत्रिक निवडणुका 

ब्रिटिश संयुक्त संघराज्यातील निवडणुका वेळापत्रकाप्रमाणे 5 मे 2022 ला होणार होत्या. परंतु ‘ब्रेक्झिट’ च्या मुद्यामुळे संयुक्त संघराज्य मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकीना सामोरे जात आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बेक्झिट कराराबाबत सहमती न झाल्याने हुजूर पक्षाचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना निवडणुकीचा पर्याय स्वीकारावा लागला आणि पुढच्याच महिन्यात तेथे निवडणुका होणार आहेत यामुळे हुजूर पक्ष, मजूर पक्ष, लिबरल डेमॉपेटस आणि इतर अन्य पक्षही कार्यरत झाले आहेत. ब्रिटिश संयुक्त संघराज्यात हुजूर व मजूर या दोन महत्त्वपूर्ण पक्षात सार्वत्रिक निवडणुका प्रामुख्याने लढल्या जात असल्यातरी निवडणुकीनंतर कधी कधी बहुमत सिद्ध करण्यासाठी लिबरल डेमॉपेट्स वा इतर छोटय़ा-मोठय़ा पक्षांची मदत घेऊन आघाडी सरकार स्थापित करण्याचा प्रयोगही हुजूर व मजूर या दोन्ही पक्षानी यापूर्वी केलेला आहे. 1960 च्या दरम्यान 10 ब्रिटिश मतदारसंघातील 8 मतदार संघ हे पक्के हुजूर वा मजूर पक्षाचे म्हणून ओळखले जात. मात्र 2010 सालापर्यंत हा आकडा 6 वर आला. याचे कारण विशिष्ट मुद्यावर आवाज उठवण्याचे व सरकारी धोरणांना विरोध करण्याचे साधन म्हणून ब्रिटिश मतदार लहान पक्षांकडे पर्याय म्हणून पाहू लागला. या स्थित्यंतरामुळे युके इंडिपेंडन्स पार्टी या उजव्या पक्षास, लिबरल डेमॉपेट्स या उदारमतवादी पक्षास आणि इतर काही पक्षांना मताधार लाभून त्यांच्या मतांची संख्या वाढत गेल्याचेही निदर्शनास आले होते. याचाच अर्थ ब्रिटिश संयुक्त संघराज्यात बराच काळ असा होता जेथे मत प्रक्रियेत मतदार हा स्थिर होता. मतदारांनी आपल्या प्रौढ वयाच्या आरंभी एकदा आपला राजकीय पक्ष निवडला की त्या पक्षास ते कायमचेच चिकटलेले राहात. परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. मतदारातील शैक्षणिक पातळी वाढणे, टेड युनियन्ससारख्या राजकीय संघटनात घट होणे, राजकीय व्यवस्थेबाबतचा
भ्रमनिरास यामुळे मतदार पर्यायांच्या बाबतीत अधिक खुला झाला आहे. केवळ ब्रिटिश लोकशाहीतच नव्हे तर पाश्चात्य लोकशाहय़ातही असेच चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. यामुळे पारंपरिक पक्षांची मक्तेदारी कमजोर होत असून राजकीय क्षितीजावर नवनवे पक्ष आपली मुळे घट्ट करीत आहेत. ब्रिटिश निवडणूक अभ्यास मंडळाने अलीकडेच जे संशोधन केले त्यातून 2010 ते 2017 या काळात झालेल्या निवडणुकात केवळ अर्ध्याच मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत एकाच प्रकारे मतदान केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या निवडणुकीत बेक्झिट जर ब्रिटनच्या हिताचे नसेल, दोलायमान परिस्थितीवर तोडगा निघत नसेल तर ब्रेक्झिट रद्द करून युरोपियन युनियनमध्येच ब्रिटनने राहणे श्रेयस्कर ठरेल अशी भूमिका घेऊन या विषयावर पुन्हा सार्वमत घ्यावे अशी मागणी करणारा लिबरल डेमॉपेटिक पक्ष या निवडणुकीत अधिक मते मिळविण्याची शक्मयता वर्तविली जात आहे तर दुसऱया बाजूने ब्रिटनने कोणत्याही कराराविना युरोपियन युनियनपासून फारकत घ्यावी आणि जागतिक व्यापार संघटनेकडून विशेष राष्ट्राचा दर्जा मिळवून आपल्या आर्थिक समस्यांवर मार्ग काढावा अशी भूमिका मांडणाऱया ब्रेक्झिट पार्टीलाही अधिक मते मिळतील असे निरीक्षण पुढे येत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक मतदारसंघात नेमका कोणाचा विजय होईल याचे भाकित वर्तविणे अत्यंत कठीण बनले आहे. मतदारसंघात जेथे चार पक्षांची लढत आहे आणि प्रत्येकास महत्त्वपूर्ण मतवाटा मिळण्याची शक्मयता आहे. तेथे अतिशय अटीतटीची लढाई होऊन अगदी कमी मताधिक्क्मयाने उमेदवार निवडून येऊन आश्चर्यकारक निकाल लागेल अशी सध्याची स्थिती आहे.  राजकीय निरीक्षकांच्या मते येत्या निवडणुकीत हुजूर व मजूर पक्षाची बरीच मते लिबरल डेमॉपेट्स व बेक्झिट पार्टी या तुलनेत लहान व नव्या पक्षांकडे वळतील. बऱयाच मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत रंगणार आहे. अशावेळी 25 ते 30 टक्के मते जर प्रत्येकी तिघात विभागली गेली आणि दहा टक्के मते जर छोटय़ा पक्षांकडे गेली तर ही 10 टक्के मते तिरंगी लढतीतील कोणत्या पक्षाकडून गेली यावर विजय पराजयाचे गणित ठरणार आहे.

एकंदरीत अस्थिर मतदार हे ब्रिटनमधील आगामी निवडणुकीचे वैशिष्टय़ ठरण्याची दाट शक्मयता आहे. तथापि, हुजूर या पारंपरिक पक्षाचे नेते व ब्रिटनचे सद्यकालीन पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि मजूर पक्ष नेते जेरेमी कॉर्बेन यांनी आपापल्या जाहीरनाम्यांसह बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. जनता आपणास बहुमताने निवडून देईल, कारण ब्रिटिश नागरिकांनी अलीकडच्या काळात पुरेशी अस्थिरता अनुभवली आहे, त्यामुळे आघाडी सरकार, छोटय़ा पक्षांना प्राधान्य हे सारेच गैरवाजवी असे मत उभयता तगडे प्रतिस्पर्धी असूनही एकमताने मांडत आहेत. अलीकडेच ‘संडे टाइम्स’ या ब्रिटनमधील सुप्रसिद्ध वृत्तपत्राने जे निवडणूकपूर्व सर्वेक्षण केले त्यातून मजूर पक्षाची गुण आघाडी मोडून हुजूर पक्षाने 6 गुण पटकावले आहेत. मजूर पक्ष व लिबरल डेमॉपेटस जनमानसात पिछाडीवर गेल्याचे संडे टाइम्सचे ‘युवर गव्हर्मेंट’ नामक सर्वेक्षण दर्शवित आहे. ब्रिटनमधील या साऱया गोंधळाच्या परिस्थितीत निवडणूक निकाल काय लागणार आणि ब्रेक्झिटचे पुढील भवितव्य कोणाच्या हाती जाणार हा जगासमोर आज औत्सुक्मयाचा प्रश्न बनला आहे.

गेल्या काही वर्षात बेक्झिटच्या एकमेव मुद्याने तीन ते चार राजवटी उलथून टाकल्या आहेत. अशा स्थितीत नवी येऊ घातलेली राजवट व सरकार ब्रेक्झिटचा मुद्दा निकालात काढेल अशी अपेक्षा प्रत्येक ब्रिटिश मतदाराची असेल. याचबरोबरीने बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, स्थलांतर, वाढती आर्थिक विषमता, वृद्धांचे प्रश्न आणि इतर अनेक समस्यांवर नवे सरकार नव्या उपाययोजना व धोरणे राबवून मात करेल ही आशाही त्यांना आहे. ब्रिटिश जनतेच्या या आशा व अपेक्षांचे प्रतिनिधित्व कोणता विजयी पक्ष वा पक्षीय आघाडी करते हे निवडणूक निकालावरूनच स्पष्ट होणारआहे.

अनिल आजगावकर मोबा.9480275418

Related posts: