|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात कलम 144 लागू

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात कलम 144 लागू 

प्रतिनिधी / बेळगाव

अयोध्या प्रकरणी उद्या (दि. 9) सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कलम 144 लागू करण्याचा निर्णय बेळगावचे पोलीस बीएस लोकेश कुमार यांनी घेतला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तरुण भारत ला माहिती दिली. शहरात शनिवारी सकाळी सहापासून रविवारी सकाळी सहापर्यंत 144 कलमान्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून कलम 144 लागू करण्यात आली आहे. तसेच शहारत मद्य विक्रीवरही बंदी घालण्यात आली असून सर्व वाईन शॉप आणि बार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जमावबंदी आणि मद्य विक्री बंदीचा आदेश मोडणा र्‍्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा आहे.

निकालाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून एक पोलिस आयुक्त, दोन डीएसपी, 5 एसीपी, 20 पीआय, 20 पीएसआय आणि 1600 पोलिसांचा ताफा सज्ज असणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Related posts: