|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » अयोध्या निकाल : कर्नाटक राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद

अयोध्या निकाल : कर्नाटक राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद 

प्रतिनिधी / बेळगाव

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय ऐतिहासिक निकाल शनिवारी देणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना केल्या आहेत. तसेच राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री एस सुरेशकुमार यांनी दिली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर देशात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी म्हणून केंद्र सरकारने राज्यांना सुरक्षेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातही चोख सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेण्यात आली असून काही शहरांत कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

Related posts: