|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अपात्र आमदारांची चिंता वाढली

अपात्र आमदारांची चिंता वाढली 

पोटनिवडणूक लांबणीवर टाकण्यास नकार : सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी/ बेंगळूर

मागील महिन्यात घोषणा झालेली पोटनिवडणूक आपल्या प्रकरणाचा निकाल घोषित होईपर्यंत लांबणीवर टाकण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी अपात्र आमदारांनी केलेली विनंती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लांबणीवर पडण्याची आशा बाळगलेल्या अपात्र आमदारांची निराशा झाली आहे.

अपात्र आमदारांच्या वतीने वकील मुकुल रोहटगी यांनी न्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर युक्तिवाद केला. खंडपीठात प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र निकाल घोषित करण्यात आलेला नाही. निकालावरच अपात्र आमदारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. 11 नोव्हेंबरपासून 17 पैकी 15 अपात्र आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जर वेळापत्रकाप्रमाणे पोटनिवडणूक झाल्यास आपल्याला त्यात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे ही निवडणूक 15 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलावी, असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत किंवा आपल्या याचिकेवर त्वरित निकाल द्यावा, अशी विनंती अपात्र आमदारांनी केली होती.

पोटनिवडणूक लांबणीवर टाकण्यासंबंधी योग्य पद्धतीने याचिका दाखल करा. त्याबाबत विचार करू, असे न्या. एन. व्ही. रमण यांनी सूचना दिली. त्यानुसार दाखल झालेल्या याचिकेवर बुधवार दि. 13 रोजी या याचिकेवर सुनावणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारपासून म्हणजेच 11 नोव्हेंबरपासून 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तत्पूर्वीच अपात्र आमदारांच्या मुख्य याचिकेवर निकाल न आल्यास अपात्र आमदारांना पोटनिवडणूक लढविण्यापासून आलिप्त रहावे लागेल. महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांच्या निवडणुकांबरोबरच कर्नाटकातही पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अपात्र आमदारांच्या विनंतीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते. 

सरन्यायाधीश म्हणाले…

कोणतीही अप्रिय घटना घडू देऊ नका

समाज माध्यमांवरही लक्ष्य ठेवा

अफवा पसरवणाऱयांना रोखा

नागरिकांनी शांतता व सलोखा राखावा

Related posts: