|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » मिडलसेक्सच्या कर्णधारपदी हॅन्डस्कॉम्ब

मिडलसेक्सच्या कर्णधारपदी हॅन्डस्कॉम्ब 

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लंडमधील इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिनयन क्रिकेटपटू पीटर हॅन्डस्कॉम्बने मिडलसेक्स क्लबशी दोन वर्षांचा करार केला आहे. आता तो या स्पर्धेत मिडलसेक्सचे इंग्लीश कौंटीच्या आगामी दोन हंगामात नेतृत्व करणार आहे.

28 वर्षीय हॅन्डस्कॉम्बने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ऑस्ट्रेलियाचे 40 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया संघाचा हॅन्डस्कॉम्ब हा विद्यमान कर्णधार आहे. त्याने 105 प्रथमश्रेणी सामन्यात 38.04 धावांच्या सरासरीने 6,277 धावा जमविल्या आहेत.

Related posts: