|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंड संघात बेअरस्टोचे पुनरागमन

इंग्लंड संघात बेअरस्टोचे पुनरागमन 

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱयावर आहे. चालू महिन्याच्या अखेरीस  उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी यष्टिरक्षक आणि फलंदाज जॉनी बेअरस्टोचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड संघातील डेन्ली जखमी असल्याने त्याच्याजागी बेअरस्टोची निवड करण्यात आली आहे.

   सध्या न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरू असून या मालिकेतील शेवटचा सामना ऑकलंडमध्ये येत्या रविवारी होणार आहे. उभय संघात पहिल्या कसोटीला 21 नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल.

   इंग्लंड संघ-रूट (कर्णधार), आर्चर, बेअरस्टो, ब्रॉड, बर्न्स, बटलर, क्रॉली, करन, डेन्ली, लीच, सकीब मेहमूद, पार्किनसन, पोप, सिबली, स्टोक्स आणि वोक्स.

Related posts: