|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » आयर्लंडच्या कर्णधारपदी बलबिर्नी

आयर्लंडच्या कर्णधारपदी बलबिर्नी 

वृत्तसंस्था/ डब्लिन

आयर्लंड क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी ऍन्ड्रय़ु बलबिर्नीची नियुक्ती केल्याची घोषणा क्रिकेट आयर्लंडने शुक्रवारी केली. तब्बल 11 वर्षे आयर्लंडच्या कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व करणारा विलियम पोर्टरफिल्डने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

2008 साली आयर्लंड संघाच्या कर्णधारपदी पोर्टरफिल्डची नियुक्ती करण्यात आली होती. त्याने आयर्लंडच्या संघाचे 253 सामन्यात नेतृत्व केले आहे. गेल्यावर्षीच्या मे महिन्यात आयर्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण पेले होते. येत्या जानेवारीत विंडीजमध्ये आयर्लंडची वनडे मालिका होणार असून या मालिकेत बलबिर्नीकडे संघाचे नेतृत्व राहिल.

 

Related posts: