|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » सात्त्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत

सात्त्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत 

  वृत्तसंस्था/   फुझुयू (चीन)

येथे सुरु असलेल्या 700,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पुरुष दुहेरीतील आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज- चिराग शेट्टी यांनी विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या भारतीय जोडीने सलग दुसऱया स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. याआधी, त्यांना पेंच ओपनमध्ये उपजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

 शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने चीनच्या बिगरमानांकित ली जुन हुई आणि ल्यु यू चेन जोडीचा 21-19, 21-15 असा पराभव केला. ही लढत 43 मिनिटे चालली. आता, उपांत्य फेरीत भारतीय जोडीसमोर जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱया इंडोनेशियाच्या मार्कस गिडॉन-केविन सुकामुजो जोडीचे आव्हान असेल. प्रारंभापासून आक्रमक खेळणाऱया  भारतीय जोडीने या सामन्यात प्रतिस्पर्धी जोडीवर चांगलेच वर्चस्व गाजवले. सात्विक-चिराग जोडीला पहिला गेम जिंकण्यासाठी चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. प्रारंभी, 12-8 अशी आघाडी घेतली होती. यानंतर प्रतिस्पर्धी चीनच्या जोडीने काही गुण मिळवत भारतीय जोडीला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. पण, सात्विक-चिराग जोडीने जोरदार पुनरागमन करत हा गेम 21-19 असा जिंकत 1-0 अशी आघाडी मिळवली. दुसरा गेम जिंकण्यासाठी भारतीय जोडीला तुलनेने कमी परिश्रम घ्यावे लागले. दुसरा गेम 21-15 असा जिंकत भारतीय जोडीने उपांत्य फेरीत गाठली.

पुरुष व महिला एकेरीत निराशा

पुरुष व महिला एकेरीत सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, पारुपल्ली कश्यप, बीसाई प्रणित, समीर वर्मा या नामांकित खेळाडूंनी सपशेल निराशा केली. मात्र सात्विक- चिराग यांनी उपांत्य फेरी गाठत भारताच्या आशा कायम ठेवल्या आहेत. थायलंड ओपन स्पर्धेचे विजेते आणि प्रेंच बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेते पटकावणाऱया भारतीय जोडीने जपानच्या सहावी मानांकित जोडी हिरोयुकी इंडो आणि युटा वाटांबे यांचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

 

Related posts: