|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘बिद्री’ने प्रदूषण विरहीत इथेनॉल प्रकल्प करावा

‘बिद्री’ने प्रदूषण विरहीत इथेनॉल प्रकल्प करावा 

प्रतिनिधी/ सरवडे

बिद्री (ता.कागल) येथील दुधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याने अधिक क्षमतेने ऊस गाळपाचे विस्तारिकरण व इथेनॉल प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. हा प्रकल्प पूर्ण करा, पण प्रदूषण नको. अशी मागणी या प्रकल्पाच्या सुनावणी प्रसंगी नागरिकांनी केली.

बिद्री कारखान्याच्यावतीने सात ते दहा हजार मेट्रिक टन ऊस गाळप विस्तारिकरण आणि प्रस्तावित मोलँसिसवर आधारित प्रतिदिन असावनी 75 किलो लिटर (इथेनॉल) प्रकल्पाबाबत पर्यावरणविषयक सुनावणी कारखाना कार्यस्थळावर झाली. सुनावणीला उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रविंद्र आंधळे, प्रशांत गायकवाड, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कारखान्याने हवा, पाणी प्रदूषणाकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे बिद्री गावासह विभागातील नागरिकांना आरोग्याचे प्रश्न उद्भवत असतात. त्यामुळे अगोदर प्रदूषणाचा प्रश्न सोडवावा मगच विस्तारिकरणाबाबत निर्णय घ्यावा अशी भूमिका नागरिकांनी मांडली.

उपजिल्हाधिकारी गलांडे म्हणाले, बिद्री साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढ संदर्भात पर्यावरण विषयक सुनावणी पूर्ण झाली आहे. यासंदर्भातील अहवाल पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. यावेळी एकविनोल प्रकल्पाची माहिती प्रोजेक्टद्वारे दिली.

जनसुनावणीवेळी कारखान्याचे अध्यक्ष के.पी.पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक आर.डी .देसाई कारखाना प्रशासन अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

आधुनिक प्रणालीने प्रदूषणाचा प्रश्न सोडवू : के.पी.पाटील 

नागरिकांच्या मागणीनुसार कारखान्याच्या प्रदूषणासंबंधी असणाऱया काही त्रुटी दूर करून विस्तारिकरणामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. या प्रकल्पात आधुनिक प्रणालीचा वापर करून प्रदूषण कमी होईल याची दक्षता घेतली जाईल. सभासदांच्या हितासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही अध्यक्ष के.पी.पाटील यांनी केले.

Related posts: