|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » निरूपयोगी प्लास्टिकपासून रस्ते बांधावेत

निरूपयोगी प्लास्टिकपासून रस्ते बांधावेत 

लवकरच अधिकाऱयांची बैठक : जिल्हाधिकारी

प्रतिनिधी/ कोल्हापूर

निरूपयोगी प्लॉस्टिकचा वापर रस्ते बांधणीत करावा, असा अध्यादेश आहे. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शुक्रवारी एकटी संस्थेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावर जिल्हाधिकाऱयांनी लवकरच सर्व विभागांतील अधिकाऱयांची यासंदर्भात बैठक घेऊन, प्रदुषण नियंत्रण मंडळ त्याचे नियोजन करेल, अशी ग्वाही दिली.

एकटी संस्थेने दिलेल्या निवेदनात शहरात निरूपयोगी प्लास्टिकचा प्रश्न गंभीर बनला आहे. विक्रीयोग्य प्लॉस्टिक रिसायकलिंगसाठी वापरले जाते, त्यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टीकचा पुनर्वापर होत नसल्याने त्याचे प्रमाण वाढत आहे. यासंदर्भात 14 जून 2016 रोजी शासन आदेश निघाला आहे. बांधकाम विभागाने प्लास्टीकपासून रस्ते बनवावेत, अशा सुचना दिल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन कायद्याची जिल्हय़ात अमंलबजावणी करावी, विभागवार प्लास्टीक संकलन केंद्र सुरू करावे, संकलन केंद्रावर कचरावेचकांना वर्गीकरणाचे काम द्यावे, आदी मागण्या केल्या आहेत.

 निवेदन देताना संस्थाध्यक्षा अनुराधा भोसले, उपाध्यक्ष संजय पाटील, सविता कांबळे, जैनुद्दीन पन्हाळकर, शबाना पन्हाळकर, अन्नपुर्णा कोगले, दीपाली सटाले, आक्काताई गोसावी, भारती कोळी, लक्ष्मी कांबळे, वसुधा संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

 

 

Related posts: