|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सांस्कृतिक मंत्र्यांच्या ‘संभाजी’ला कोल्हापूरकरांची उत्स्फुर्त दाद

सांस्कृतिक मंत्र्यांच्या ‘संभाजी’ला कोल्हापूरकरांची उत्स्फुर्त दाद 

गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी साकारली छत्रपती संभाजींची व्यक्तिरेखा,

प्रतिनिधी/ कोल्हापूर

संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृहाच्या रंगमंचावर गुरूवारी रात्री ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटक सादर झाले. गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी साकारलेल्या छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेला कोल्हापूरकरांनी उत्स्फुर्तपणे दाद दिली. मध्यतरांत मान्यवर कलाकारांचा सत्कार करण्यात आला. बोचऱया थंडीतही कोल्हापूरकरांनी या नाटय़प्रयोगाला अखेरपर्यत हजेरी लावली.

येथील प्रतिज्ञा नाटय़रंग संस्था व गोवा येथील सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी गोव्याच्या कलाकारांनी साकारलेला वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटय़प्रयोग गुरूवारी येथील केशवराव भोसले नाटय़गृहात सादर झाला. गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. प्रतिज्ञा नाटय़रंग संस्थेने 19 वर्षांपासून गरजूंच्या मदतीसाठी  नाटय़प्रयोग, संगीत मैफिलींच्या उपक्रम राबवला आहे. त्यासाठी सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी ‘प्रतिज्ञा नाटय़रंग’च्या या उपक्रमाला .रवींद्र नाईक दिग्दर्शित ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकांचे प्रयोग कोल्हापुरात सादर केले.

रंगमंच पूजनानंतर नाटक सुरू झाले. मध्यंतरांत प्रतिज्ञा नाटय़रंग संस्थेच्यावतीने कलाकार, मंत्री गोविंद गावडे, कार्यक्रम अधिकारी गोविंद शिरूडकर, कलाकार भालचंद्र उसगावकर यांचा अभिनेते प्रशांत जोशी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते नाटय़कर्मी प्रशांत जोशी आणि ध्वनीतंत्रज्ञ रमेश सुतार, प्रेक्षित शेडगे, मिलिंद अष्टेकर, सुनील घोरपडे, नाटय़गृह व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंत्री गावडे यांच्या हस्ते ग्रोथ हार्मोन्स डिफिशियन्सीने ग्रस्त असलेल्या आदित्य शिंदे, सुरज शिंदे या मुलांना आथ्&िा&क मदत करण्यात आली. पंडीत कंदले यांनी स्वागत केले. प्रशांत जोशी यांनी आभार मानले.

गोव्यातील श्री विठोबा मारुती देवस्थान, घोणशी, बांदोडा-फोंडा यांनी ही निर्मिती होती. लेखक वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’चे दिग्दर्शक- रवींद्र नाईक आहेत. नाटकामध्ये गोव्यातील गिरीश वेळगेकर, महेश शिलकर, रतिष गावडे, नम्रता नाईक, प्रशांत वझे, दिलेश कोलवेकर, ईश्वर नाईक, संदीप फडते, गजानन नाईक, केदार गावडे, अमोल नाईक यांनी भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका गोव्याचे कला व सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे यांनी साकारली आहे. उत्कृष्ट नेपथ्य अन् प्रभावी प्रकाशयोजनेमुळे नाटकाला कोल्हापूरकरांची दाद अखेरपर्यत मिळत गेली.

Related posts: