|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अवकाळीचे 43 हजारावर हेक्टरचे पंचनामे पूर्ण

अवकाळीचे 43 हजारावर हेक्टरचे पंचनामे पूर्ण 

प्रतिनिधी/ सांगली

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे सुरू असून शुक्रवारपर्यंत जिह्यातील 573 बाधित गावातील 68 हजार 134 शेतकऱयांचे 43 हजार 16 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. 22 हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. त्यांचेही पंचनामे गतीने करण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा कृषि अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी सांगितले.

परतीच्या पावसाने जिह्यातील द्राक्ष, डाळिंबासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत शेतकऱयांसह सर्वच स्तरातून मागणी झाल्यानंतर शासनाने भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल आणि कृषि विभागाच्या वतीने पंचनामे केले जात आहेत. तासगाव तालुक्यातील 69 बाधित गावातील 68 हजार 209 शेतकऱयांचे 43 हजार 277 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 34 हजार 104 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 28 हजार 80 शेतकऱयांचे 15 हजार 957 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाली असून 18 हजार 147 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱयापैकी 19 हजार 853 शेतकरी विमा संरक्षित असून उर्वरित 48 हजार 356 शेतकऱयांचे विमा संरक्षण नाही. आटपाडी तालुक्यातील 37 बाधितगावातील 598 शेतकऱयांचे 9315.30 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 356.50 हेक्टर बाधित झाले असून 3010 शेतकऱयांचे 1880 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाली आहेत.

पलूस तालुक्यातील 36 बाधित गावातील 772 शेतकऱयांचे 19 हजार 988 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 317.80 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 1347 शेतकयांचे 674.64 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाली आहेत. खानापूर तालुक्यातील 66 बाधितगावातील 19 हजार 512 शेतकऱयांचे 36 हजार 689 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 9125 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 10 हजार 946 शेतकऱयांचे 5655.64 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 3469.36 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱयापैकी 8806 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 10 हजार 706 शेतकऱयांचे विमा संरक्षण नाही. कडेगाव तालुक्यातील 56 बाधितगावातील 1145 शेतकऱयांचे 38 हजार 455 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 447 हेक्टर बाधित झाले आहेत.

वाळवा तालुक्यातील 44 बाधितगावातील 1778 शेतकऱयांचे 66 हजार 768 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 729 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 1664 शेतकऱयांचे 710 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाली असून 19.20 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱयापैकी 131 शेतकरी विमा संरक्षित असून उर्वरित 1647 शेतकऱयांचे विमा संरक्षण नाही. कवठेमहांकाळ तालुक्यातील 60 बाधितगावातील 16 हजार 425 शेतकऱयांचे 24 हजार 157 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 10 हजार 990.30 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 11 हजार 483 शेतकऱयांचे 7832 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाली असून 3158.30 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱयापैकी 8662 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 7763 शेतकयांचे विमा संरक्षण नाही.

जत तालुक्यातील 72 बाधितगावातील 8940 शेतकऱयांचे 65 हजार 815 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 4125.50 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 2915 शेतकऱयांचे 1343 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाली असून 2782.50 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱयांपैकी 15 शेतकरी विमा संरक्षित असून शिराळा तालुक्यातील 61 बाधितगावातील 442 शेतकऱयांचे 32 हजार 099 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 73.30 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 538 शेतकऱयांचे 80.94 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाली आहेत. मिरज तालुक्यातील 72 बाधितगावातील 7247 शेतकऱयांचे 40 हजार 556 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 4998.40 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 5195 शेतकऱयांचे 3750.72 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाली असून 1247.68 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱयांपैकी 211 शेतकरी विमा संरक्षित असून उर्वरित 7036 शेतकऱयांचे विमा संरक्षण नाही.

जिह्यातील बाधित शेतकऱयापैकी 37710 शेतकरी विमा संरक्षित असून उर्वरित 89265 शेतकऱयांचे विमा संरक्षण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related posts: