|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बेडगेतील ओमासे दाम्पत्याला महापूजेचा मान

बेडगेतील ओमासे दाम्पत्याला महापूजेचा मान 

पंढरपूर / प्रतिनिधी

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठलाच्या महापूजेचा मान तालुक्यातील बेडग येथील सुनील महादेव ओमासे आणि सौ. नंदा ओमासे या दाम्पत्याला मिळाला आहे. शुक्रवारी पहाटे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत त्यांनी विठ्ठलाची पूजा केली. ओमासे दाम्पत्याला हा मान मिळाल्याने बेडगेसह जिल्हय़ातील वारकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

   पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त मुख्य पूजा शासकीय पातळीवर होते. एकादशीदिवशी पहाटे शासनातील मंत्र्यांच्या हस्ते ही पूजा होते. गेल्या काही वर्षांपासून प्रथम येणाऱया वारकरी दांपत्यालाही या पूजेचा मान देण्यात येतो. निवड झालेल्या वारकरी दांपत्याला मंत्र्यांच्या बरोबर श्री विठ्ठल-रूक्मिणीची पूजा करता येते. हा मान मिळावा म्हणून राज्यभरातून वारकरी प्रथम रांगेत उभारण्याचा प्रयत्न करतात. यंदा हा मान बेडग येथील सुनील ओमासे आणि सौ. नंदा ओमासे यांना मिळाला. शुक्रवारी पहाटे त्यांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर पूजा करण्याचा मान मिळाला. सुनील ओमासे हे गेली 16 वर्षे पायी वारी करतात. बेडग येथे मल्लेवाडी रस्त्यावर त्यांचे घर आहे. शेती आणि किराणा दुकान चालवून ते उदरनिर्वाह करतात. त्यांना कृष्णा हा मुलगा आणि प्रज्ञा ही मुलगी आहे. हे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायातील आहे. घरात नेहमी भजन-कीर्तनाची परंपरा आहे.

  गावातील ओमासे दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाल्याचे समजताच बेडग गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बेडगेतील वारकऱयांनी याचा आनंद व्यक्त केला.

Related posts: