|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विठ्ठलभक्तांवर काळाचा घाला…

विठ्ठलभक्तांवर काळाचा घाला… 

पाच ठार, सहा जखमी : पिकअप व टॅक्टरची समोरासमोर धडक

 प्रतिनिधी /  सांगोला

विटा भरलेल्या ट्रक्टरने पिकअप वाहनास समोरासमोर धडक दिल्याने बेळगाव येथील विठ्ठलभक्तांवर काळाचा घाला घातला. यामध्ये बेळगाव जिह्यातील पाच विठ्ठलभक्त जागीच ठार झाले. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी बेळगाव येथील भाविक पंढरपूरकडे निघाले होते. सांगोला तालुक्यातील मांजरी येथे ही दुर्घटना घडली. 

बेळगाव जिह्यातील सुमारे दहा ते बारा भाविक हे  पिकअप (केए 22बी-5815) मधून पंढरपूरला जात होते. शुक्रवार पहाटे 4.30 ते 5 वाजणेच्या सुमारास भाविकांच्या पिकअपची समोरून येणाऱया विटवाहू ट्रक्टरला (एमएच13एएन0992) जोराची धडक दिली. सदरचा अपघात इतका भीषण होता की पिकअपचा चक्काचूर झाला आहे. अपघातात बेळगाव तालुक्यातील लक्ष्मण उर्फ टेलर परशराम आंबेवाडीकर (वय 46), महादेव मलाप्पा कनबरकर (वय 46), अरुण दत्तात्रय मुत्तेकर(वय 36), कृष्णा वामन कनबरकर(वय37), चालक यलाप्पा देवाप्पा पाटील(वय 46) रा. सर्वजण हंगरगा ता.जि. बेळगांव येथील पाच वारकरी ठार झाले. तर उर्वरित सहाजण जखमी असून त्यांच्यावर पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत.

सांगोला पासून पंढरपूर हे अवघ्या अठठावीस किलोमीटरवर आहे. विठ्ठलाच्या दर्शनापासून हे भाविक केवळ अर्धा तासाच्या अंतरावर होते. सदरचा अपघात हा पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सदर अपघाताची फिर्याद परशराम दळवी रा. मंडोळी ता.जि. बेळगांव यांनी दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सपोई नलवडे करीत आहे.

 लोकमान्य आणि तरूण भारतची मदत

    बेळगाव येथील भाविकांचा अपघात घडला. यानंतर जखमींना सांगोला आणि पंढरपूर येथे उपचार सुरू होते. या दोन्हीही ठिकाणी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी बेळगाव शाखा सांगोला आणि पंढरपूरच्या कर्मचाऱयांनी तातडीची सर्व मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच जखमींना आणि या भाविकांना धीर देण्याचे देखिल काम केले. यामधे तरूण भारत संवादच्या परिवारांचा देखिल मोठा हातभार होता.

Related posts: