|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत रंगला कार्तिकीचा सोहळा

पाच लाख भाविकांच्या उपस्थितीत रंगला कार्तिकीचा सोहळा 

महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली विठोबाची शासकीय महापूजा 

पंढरपूर / प्रतिनिधी

विठ्ठल विठ्ठल गजरी…. अवघी दुमदुमली पंढरी…. असेच काहीसे वातावरण आज पंढरीत सर्वदूर पहावयास मिळाले. कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळयासाठी सुमारे 5 लाख भाविकांची उपस्थिती होती. यामधेच विठ्ठलाची शासकीय महापूजा महसुलमंत्री चंद्रकात पाटील यांनी सपत्नीक केली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून सांगली जिह्यातील सुनिल आणि नंदा ओमासे या दांपत्याला बहुमान मिळाला.

कार्तिकी एकादशीनिमित्त विठोबाची शासकीय महापूजा महसुलमंत्री चंद्रकात पाटील यांनी सपत्नीक केली. यावेळी त्यांच्यासमवेत मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा बहुमान सांगली जिह्यातील मिरज तालुक्यातील मल्लेवाडी रोड, बेडग येथील सुनिल आणि नंदा ओमासे यांना मिळाला.

एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर रोडच्या पत्राशेडपर्यत गेली होती. त्यामुळे दर्शनासाठी सुमारे 8 ते 10 तासांचा कालावधी लागत होता. मुखदर्शन अवघ्या दीड ते दोन तासांच्या कालावधीमध्ये होत होते.

एकादशीच्या सोहळयानिमित्त सकाळपासून चंद्रभागा तरी स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती. चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा आणि त्यानंतर विठोबाचे चरण अथवा मुखदर्शन करून लाखों भाविकांनी एकादशीचा सोहळा अनुभवला. दुपारनंतर निघालेल्या राही-रखुमाईच्या रथोत्सवाला देखिल भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. याशिवाय जनावरांच्या बाजारामध्ये देखिल मोठय़ा प्रमाणावर गर्दी दिसून आली. यामध्ये काही प्रमाणामध्ये व्यवहार देखिल झालेले दिसून आले.

विशेष म्हणजे यंदाच्या वारीमध्ये देखित अवकाळी पावसांचा फ्ढटका बसेल. अशी शक्यता होती. मात्र दशमी आणि एकादशी अशी दोन्हीही दिवशी पावसाने दडी मारली. त्यामुळे कार्तिकीचा सोहळा हा निर्विघ्नपणे पार पडला.

महुसलमंत्र्यांचे विठोबास साकडे…

राज्यातील ऋतुचक्र हे बदलले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीतून जनतेला आणि शेतकऱयाला मार्ग काढय़ासाठी आणि त्यासाठी सरकारला उपाययोजना करण्यासाठी बळ मिळू दे. तसेच शेतकरी आणि राज्यातील जनतेला सुखी ठेव. असे साकडे यावेळी महसुलमंत्री चंद्रकात पाटील यांनी विठोबास घातले.

Related posts: