|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भरणेनजीक अपघातात दोघी गंभीर जखमी

भरणेनजीक अपघातात दोघी गंभीर जखमी 

प्रतिनिधी/ खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अल्टो कार व इनोव्हा व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात दोघी गंभीररित्या जखमी झाल्या. याप्रकरणी इनोव्हा कारचालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुनम भिकाजी भोसले (30), श्रीमती आरती भिकाजी भोसले (56, रा. ठाणे) अशी जखमी महिलांची नावे आहेत. जखमींना उपचारार्थ भरणे येथील एस.एम.एस. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिक गंभीर बनल्याने अधिक उपचारार्थ डेरवण रूग्णालयात दाखल करण्यात आले. रमेश सुदाम चौरे (रा. घाटकोपर-मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

विरेश भिकाजी भोसले (26) यांनी येथील पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या ताब्यातील अल्टो कार भरणे येथे उभी होती. याचदरम्यान भरधाव येणाऱया इनोव्हा कारची मागून धडक बसल्याने दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्या. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस यंत्रणांसह मदतकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतग्रुपचे प्रसाद गांधी यांच्या रूग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातप्रकरणी इनोव्हा कारचालक सुदाम चौरे याच्यावर भादंवि कलम 279, 337, 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सत्यवान मयेकर करत आहेत.

Related posts: