|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गणपतीपुळ्यात बुडणाऱया 12 जणांना जीवदान

गणपतीपुळ्यात बुडणाऱया 12 जणांना जीवदान 

वार्ताहर/ गणपतीपुळे

गणपतीपुळे सामुद्रात शुक्रवारी तीन वेगवेगळया घटनांमध्ये बुडणाऱया बाराजणांना वाचविण्यात स्थानिकांना यश आल़े बदलापूर, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद यांसह रत्नागिरीतील नाचणे येथील 12 पर्यटक-भाविकांचे प्राण स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत.

    मारिया अखिल फकीर (12), सिमरन अखिल फकीर (16), मुबारक शेख (20) आणि रत्नदिप हरिहर शहा (24, सर्व रा. रत्नागिरी नाचणे), प्रणय दत्तात्रय भिसे (18), दिपक तुकाराम हरडकर (30), विजय रविंद्र भिसे (27), भालेश गजानन भिसे (27), विकास गजानन भिसे (24, ऱा सर्व बदलापूर) मनिष सुरेश सोनवणे (31, ऱा औरंगाबाद),  महेश अशोक जाधव (35, ऱा नाशिक),  विशाल लक्ष्मण शिंदे (21, ऱा  हिंगोली) अशी वाचविण्यात आलेल्यांची नावे आहेत़

   रत्नागिरी नाचणे येथील चार पर्यटक दुपारी पावणे तीनच्या सुमारास पोहण्यासाठी गणपतीपुळे समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात ओढले गेले. बुडू लागल्याने चौघांनीही आरडाओरड सुरू केली. चौघांचा आवाज एकुन किनाऱयावरील जिवरक्षकांनी आणि ग्रामस्थांनी या चौघांचे प्राण वाचवले. 

  बदलापूर येथील प्रणय भिसे, दिपक हरडकर,  विनय भिसे,  भालेश भिसे, विकास भिसे हे गणपतीपुळेत देवदर्शनासाठी आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास हे पाचहीजण समुद्रात आंघाळीसाठी उतरले असताना खोल पाण्यात बुडू लागले. जीवरक्षक आणि स्थानिक विक्रेत्यांनी त्यांना समुद्रातून बाहेर काढले. तर तिसऱया घटनेत मनिष सोनवणे, महेश जाधव आणि विशाल  शिंदे  या तिघांना गणपतीपुळे समुद्रात बुडताना वाचण्यात आले. 

  सुलभ शौचालय चालक निखिल सुर्वे, जीवरक्षक आशिष माने, अनिकेत राजवाडकर, ओंकार गवाणकर, मयुरेश देवरुखकर आणि अक्षय माने, वॉटर स्पोर्टचे चालक मोमिन खान, चेतन बोरकर, प्रशांत बोरकर आणि नूर खान यांनी बुडणाऱया पर्यटकांना वाचविण्यात योगदान दिले. यामध्ये निखिल सुर्वे यांनी महत्वाची भुमिका बजावली.

Related posts: