|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जनता दरबारासाठी राष्ट्रवादी भवन पुन्हा गजबजले

जनता दरबारासाठी राष्ट्रवादी भवन पुन्हा गजबजले 

प्रतिनिधी/ सातारा

सहा वर्षापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती, तेव्हा गर्दीचा डामडोल होता. तसाच डामडोल पुन्हा आणण्याचा प्रयत्न माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. त्यामुळे पुन्हा गर्दीने राष्ट्रवादी भवन फुलून गेले होते. आलेल्या 61 तक्रारींवर लगेच स्वीय्य सहाय्यक व कार्यकर्त्यांकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना फोनवरुन सूचना दिल्या.

माजी आमदार शशिकांत शिंदे हे गर्दी जमवणारे नेते. लोकांचे प्रश्न हाताळणारे नेते म्हणून त्यांची ओळख असल्याने त्यांनी नुसते आवाहन केले अन् राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते झाडून राष्ट्रवादी भवनात हजर झाले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, दीपक पवार, बाळासाहेब सोळस्कर, जयश्री फाळके, दत्तात्रय उत्तेकर, राजकुमार पाटील, संमिद्रा जाधव, जयश्री फाटील, दत्तात्रय पाटील, अतुल शिंदे, विजय कुंभार, शफीक शेख, सचिन कुऱहाडे, अशोकराव जाधव, कुसूमताई भोसले, सीमा जाधव, सुनीता शिंदे, मारुती इदाटे, सतीश चव्हाण, अरुण माने, भास्कर कदम, गोरखनाथ नलावडे आदी उपस्थित होते. यामध्ये पाटण तालुक्यातील वयस्कर शेतकरी रंगराव बापू मोरे यांनी महसूल उपायुक्तांकडील जमिनीच्या संदर्भात अडचण शशिकांत शिंदे यांना सांगितली. शिंदे यांनी लगेच उपायुक्तांना फोनवरुन अडचण सोडविली. तसेच बसाप्पाच्यावाडीतील 100 टक्के अपंग असणाऱया लहान मुलाच्या आई-वडिलांनी त्यांच्या अपंग प्रमाणपत्राचे काम सांगितले. त्यांनी लगेच सिव्हिल सर्जन यांना फोन लावून त्वरित अपंग प्रमाणपत्र देण्यास सांगितले. या जनता दरबारात नोकरी, महसूल खाते, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आदी विभागाच्या तक्रारी दिल्या गेल्या. त्या-त्या विभागाच्या अधिकाऱयांशी शशिकांत शिंदे यांनी फोनवरुन तक्रारी सोडविण्यात आल्या.::

Related posts: