|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » भुयारी गटर योजनेचे वाजले तीन तेरा

भुयारी गटर योजनेचे वाजले तीन तेरा 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहराचा दुसरा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे भुयारी गटर प्रकल्प. या प्रकल्पाचे काम सुरुवातीपासूनच आतबटय़ात होवू लागले आहे. पुढचे पाठ मागचे सपाट या उक्तीप्रमाणे ठेकेदारांकडून पुढे काम करत जात आहेत. परंतु पाठीमागे खोदलेले रस्ते, फोडलेल्या पाईपलाईन जोडल्या जात नाहीत. त्यामुळे या योजनेचेच तीन तेरा वाजले आहेत. सध्या कुपर कॉलनीत काम सुरु असून तेथेही लगीन घाई  ठेकेदाराकडून होताना दिसत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होवू लागला आहे. या योजनेला 100 कोटी रुपये मंजूर असून सातारा पालिकेला यासाठी 42 कोटी सध्या दिल्याचे समजते.

सातारा शहराचे गटर हे भुयारातून नेले जाणार आहे, अशी दिवास्वप्न सातारकरांना पडली होती. परंतु गटर साध्या पाईपमधून नेले जात आहे. सातारा शहराला होणारा पाणी पुरवठा आणि त्यावर पावसाचे पाणी याचेच गणित जुळत नसल्याने टाकलेल्या गटाराच्या पाईपमधूनच पुन्हा घराघरातले संडास चोकअप होण्याची शक्यता साताकरांनीच वर्तवली आहे. असे असताना भुयारी गटरचे काम करणाऱया ठेकेदाराने सातारा शहरातील चार टप्यात असलेले काम कधी धिम्या गतीने तर कधी वेगाने सुरु ठेवले आहे. आज त्या कामात अनेक त्रुटी दिसून येत आहेत. गटरची पाणी एकत्र करुन सेगरेशन प्लॉन्ट तयार करण्याच्या कामाचे तीन तेरा वाजले आहेत.मंगळवार पेठेपासून करंज्यात काम करताना अनेक चुकीचे प्रकार घडले गेले आहेत. अनेक ठिकाणी पाईपलाईन तुटल्या आहेत. खोदलेले रस्ते पुन्हा जसे होते तसे केले नाहीत. काही ठिकाणी रस्ते आरले आहेत. त्यामुळे या योजनेचा पुरता बोऱया उडला आहे. 

नगराध्यक्षांनी दौरा रद्द केला

भुयारी गटरच्या कामाची पाहणी करण्याकरता नगराध्यक्षा सौ. माधवी कदम या शुक्रवारी निघाल्या होत्या. मात्र, त्यांना काही नगरसेवकांनी नका जावू लोकं चिडलेत, लोकांना काय उत्तरे द्यायची, असा प्रश्न केला तर काही नगरसेवकांनी तुम्ही चला तर तेथे म्हणजे तुम्हाला समजेल कसे काम झाले आहे. अखेर नगराध्यक्षांनीच पाहणी दौरा रद्द केला.

पहिले चांगले काम करा मगच पुढे न्या

काम केले तर चांगले करा. उगाच लोकांना त्रास देण्याकरता काम करु नका. आज मंगळवार पेठेत चेंबरची कामे चुकीच्या पद्धतीने झालेली आहेत. उकरलेले रस्त्यांचे खड्डे तसेच आहेत. पहिले ते काम करा मगच पुढे न्या.

वसंत लेवे नगरसेवक

ठेकेदाराने योग्य काम केले पाहिजे

आज माझ्या वॉर्डात चला भुयारी गटरसाठी जी खोदाई केली आहे. त्या खुदाईनंतर पुन्हा रस्त्याचे पॅचिंग करणे गरजेचे होते. ते पॅचिंग झाले नाही. त्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता आहे. वयोवृद्धांना त्रास होतो. हा त्रास आम्ही तेथील लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला होतो हे त्या ठेकेदारास समजत नाही.

Related posts: