|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी आक्रमक

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी आक्रमक 

वार्ताहर/ एकंबे

निसर्गाने कोरेगाव तालुक्यावर प्रकोप केला असून, अगोदर दुष्काळ आणि आता अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णत: अडचणीत आला आहे. शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले असून, शासन पंचनामे होण्याची वाट पाहत आहे. प्रशासनाने पंचनाम्याचे काम पूर्ण होण्याची वाट न पाहता, सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.

कोरेगाव तालुक्यातील कुमठे, सातारारोड, तडवळे संमत कोरेगाव, कठापूर, भोसे, गोळेवाडी, आसरे, सुलतानवाडी, एकंबे, जळगाव येथील शेतकऱयांनी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, नगरसेवक महेश बर्गे, युवा पदाधिकारी अमरसिंह बर्गे, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, शहरप्रमुख अक्षय बर्गे, चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तहसील कार्यालयावर धडक दिली. नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे आणि श्रीरंग मदने यांची भेट घेऊन, तालुक्यातील पावसाची परिस्थिती, शेतकऱयांचे झालेले नुकसान आणि प्रशासनाच्या पंचनामे प्रक्रियेविषयी चर्चा केली.

पावसामुळे शेतकऱयांच्या थेट बांधावर जाण्यास प्रशासकीय कर्मचाऱयांना अडचणी आहेत, त्यामुळे वस्तुस्थितीनिष्ठ पंचनामे करण्यास वेळ लागणार आहे. पंचनाम्याची प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत शासन नुकसान भरपाई मिळणे अवघड बनणार आहे. प्रशासनाने शेतकऱयांचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याची नोंद घेऊन सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत दिनेश बर्गे यांच्यासमवेत अमरसिंह बर्गे, सुनील बर्गे, सचिन झांजुर्णे, अक्षय बर्गे, सम्राट बर्गे, चंद्रकांत जाधव, भरत भोज यांनी भाग घेतला.

 

 

 

Related posts: